'हार्दिक पांड्या चंद्रावरून आलाय का?', Praveen Kumar ने ओढले मुंबईच्या कॅप्टनवर ताशेरे, म्हणतो...

Praveen Kumar on Hardik Pandya : हार्दिक पांड्याला बीसीसीआयकडून मिळत असलेल्या सवलतीवर माजी क्रिकेटर प्रविण कुमार याने प्रश्न उपस्थित केले आहेत.

सौरभ तळेकर | Updated: Mar 14, 2024, 08:44 PM IST
'हार्दिक पांड्या चंद्रावरून आलाय का?', Praveen Kumar ने ओढले मुंबईच्या कॅप्टनवर ताशेरे, म्हणतो... title=
IPL 2024, Praveen Kumar, Hardik Pandya

Praveen Kumar Statement : बीसीसीआयने वार्षिक करार जाहीर करताना श्रेयस अय्यर आणि इशान किशन यांना धक्के दिले. या दोन्ही खेळाडूंना वार्षिक करार यादीत सामील केलं नाही. डोमेस्टिक क्रिकेट (Domestic Cricket) खेळत नसल्याने बीसीसीआयने कारवाई केलीये. मात्र, डोमेस्टिक क्रिकेट न खेळून देखील हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) करारात सामील केलं, तेही A श्रेणीत त्याला जागा दिली. बीसीसीआयने पांड्याला स्पेशल ट्रिटमेंट दिल्याने हार्दिक बीसीसीआयचा जावई आहे का? असा सवाल क्रिडाविश्वातून विचारला जातोय. त्यावर आता टीम इंडियाचा माजी स्टार गोलंदाज प्रविण कुमारने (Praveen Kumar) टीका केली आहे.

काय म्हणाला प्रविण कुमार?

आजकालची पोरं नुसतं रिल्स बनवतात आणि पार्ट्या करतात. तुम्ही नक्कीच करा माझं काहीही म्हणणं नाहीये, पण तुमच्यासाठी महत्त्वाचं काय आहे? तुम्हाला देश महत्त्वाचा वाटतो की फ्रँचायझी? असा सवाल प्रविण कुमारने विचारला आहे. मी आधीही यावर बोललो आहे. तुम्ही आधी डोमेस्टिक क्रिकेट खेळलं पाहिजे. त्यात तुम्ही चांगली कामगिरी करून वर गेलं पाहिजे, असं प्रविण कुमार म्हणाला. तुम्ही फक्त आयपीएल खेळून चालणार नाही. आयपीएल खेळायची अन् सगळं ठीक होईल, असं काही नसतं. ही चुकीची गोष्ट आहे. तुम्ही आयपीएलच्या बरोबर आधी जखमी होता अन् आराम करता. आयपीएल आली की तुम्ही उठून उभा राहता अन् आयपीएल खेळता, असं म्हणत प्रविण कुमारने पांड्याला फटकारलं आहे.

तुम्ही करताय ते चुकीचं आहे. आता तर बोर्डाने देखील म्हटलंय की, सर्वांना खेळावं लागेल, इशान असो वा श्रेयस.. सर्वांना नियम सारखे असावे, बीसीसीआयने बरोबरच निर्णय घेतला, असंही प्रविण कुमारने म्हटलं आहे. त्यावेळी त्यांना पांड्यावर थेट वक्तव्य केलं. पांड्या काय चंद्रावरून आलाय का? त्याला देखील खेळावं लागेल. त्याच्यासाठी वेगळा नियम आहे का? असा सवाल प्रविण कुमार याने विचारलाय. बोर्डाने त्याला धमकावलं पाहिजे, असं असेल तर बोर्डाला त्याने लिहून दिलं पाहिजे मी टेस्ट क्रिकेट खेळणार नाही. ना तू टेस्ट खेळतो, नाही तू लिहून देतोय, असं म्हणत त्याने सडकून टीका केलीये.

दरम्यान, एका खेळाडूसाठी तुम्ही वेगळा नियम करू शकत नाही. बोर्डाने यावर लक्ष दिलं पाहिजे आणि कठोर निर्णय घेतले पाहिजेत. आधीच्या काळी कॅप्टन तुम्हाला सांगायचा, आम्ही तुला वनडे साठी बघतोय किंवा कसोटी साठी तयार करतोय. आता माझ्या मते पांड्याला सांगितलं असेल की, आम्ही तुला कसोटीसाठी बघत नाहीये, असं नक्की होऊ शकतं. त्यांचं काय झालंय मला माहिती नाहीये. पण ही फक्त श्रेयस किंवा इशान बद्दल नाही, तर आजकाल हीच परिस्थिती आहे, असंही प्रविण कुमार म्हणतो.