बर्मिंघम : चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७ 'ग्रुप ए'च्या शनिवारी झालेल्या मॅचमध्ये इंग्लंडनं ऑस्ट्रेलियाला डकवर्थ लुईस पद्धतीत ४० रन्सनं पछाडलंय.
यासोबतच आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमधून ऑस्ट्रेलियाला बाहेर निघावं लागलंय तर बांग्लादेशची सेमीफायनलमध्ये जागाही यामुळे पक्की झालीय.
मार्क वुडच्या नेतृत्वाखाली इंग्लंडच्या बॉलर्सनं उत्तम खेळ केला. तर बेन स्टोक्सच्या शतकाचीही इंग्लंडला चांगलीच मदत झाली.
टॉस गमावल्यानंतर पहिल्यांदा बॅटिंगसाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाच्या तीन बॅटसमननं अर्धशतक पूर्ण केलं. ट्रेविस हेडनं सर्वाधिक नाबाद ७१ रन्स केले. ९ विकेटवर २७७ रन्स करण्यात ऑस्ट्रेलिया यशस्वी झाली. इंग्लंडकडून मार्क वुडनं १० ओव्हर्समध्ये ३३ रन्स देऊन चार विकेट घेतले.
इंग्लंडनं ४०.२ ओव्हरमध्ये चार विकेटवर २४० रन्स ठोकले. तेव्हाच मॅच दरम्यान पाऊस सुरू झाला... डकवर्थ लुईस पद्धतीनं यावेळी बरोबरीचा स्कोअर २०४ रन्स होता.... आणि त्यामुळेच इंग्लंड लीगमध्ये आपल्या तीन मॅच जिंकण्यात यशस्वी ठरली.