फुटबॉलचा थरार, टेनिसची बहार, क्रिडा प्रेमींसाठी सुखद रविवार!

या रविवारी 11 जुलैला होणाऱ्या 3 अंतिम सामन्यांच्या निमित्ताने प्रेक्षकांना सन डे घर बसल्या अगदी मजेशीर होणार आहे.

Updated: Jul 10, 2021, 07:36 AM IST
फुटबॉलचा थरार, टेनिसची बहार, क्रिडा प्रेमींसाठी सुखद रविवार! title=

मुंबई : कोरोनाकाळात रसिकांच्या टेन्शनची मात्र कमी करण्यासाठी या सन डे ला क्रीडा प्रेमींना महत्वाच्या सामन्यांची चांगलीच मेजवानी अनुभवता येणार आहे, या रविवारी 11 जुलैला होणाऱ्या 3 अंतिम सामन्यांच्या निमित्ताने प्रेक्षकांना सन डे घर बसल्या अगदी मजेशीर होणार आहे. सोबतच भारत आणि इंग्लंड  यांच्यातील महिला टी-20 सामना देखील असल्याने प्रेक्षकांना मनोरंजनाची चांगलीच मेजवानी मिळणारये.

रविवारी सकाळी 5 वाजून 30 मिनिटांनी ब्राझील vs अर्जेंटिना हा कोपा अमेरिका स्पर्धेतील अंतिम सामना रंगणार आहे. त्यानंतर मध्यरात्री 12 वाजून 30 मिनिटांनी इंग्लंड vs इटलीमध्ये युरो अंतिम सामना पाहायला मिळणार आहे. 
या दोन सामन्यांच्या मध्ये संध्याकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी विम्बल्डनच्या हिरवळीवर पुरुष  एकेरीचा अंतिम सामना रंगणार आहे. टेनिसमधील सर्वांत प्रतिष्ठित स्पर्धेतील उत्सुकता वाढवणारा सामना आस्वादणे यापेक्षा उत्तम मध्यांतर फुटबॉल सामन्यांसाठी  कोणता ठरू शकतो?

पुरुष क्रिकेट संघ सध्या इंग्लंडमध्ये मोठी विश्रांती घेत असला, तरी महिलांचे सामने सुरू झाले आहेत. भारत-इंग्लंड टी-20 मालिकेतील दुसरा सामना संध्याकाळी 7  वाजता होणार आहे. फुटबॉल, टेनिस आणि क्रिकेट असा हा त्रिवेणीसंगम टेलिव्हिजनवर लाखोंना खिळवून ठेवणार एवढं मात्र नक्की. 

कोणते सामने कुठे पाहायला मिळणार ?

कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धा ( अंतिम सामना )
सकाळी 5.30 वा.
थेट प्रक्षेपण : सोनी टेन २आणि संबंधित एचडी वाहिनी.

****
युरो चषक फुटबॉल स्पर्धा ( अंतिम सामना )
मध्यरात्री 12.30 वा.
थेट प्रक्षेपण : सोनी टेन 2,

****
 महिलांचा ट्वेन्टी-20 सामना 
सायंकाळी 7 वा.
सोनी टेन 3 (हिंदी) एचडी वाहिन्या. 
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, सिलेक्ट १ आणि एचडी वाहिन्या.

****
विम्बल्डन टेनिस स्पर्धा ( पुरुष एकेरीचा अंतिम सामना )
सायंकाळी 6.30 वा.
थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स 1, सिलेक्ट 1 आणि एचडी वाहिन्या.