Pele dies aged 82: फुटबॉल विश्वातील 'किंग', पेले यांनी केले 1200 पेक्षा जास्त गोल

Brazilian Football Player Pele dies:ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांचे रात्री निधन झाले. आपल्या 21 वर्षांच्या फुटबॉल कारकिर्दीत त्यांनी अनेक विक्रम आपल्या नावावर केले.

सुरेंद्र गांगण | Updated: Dec 30, 2022, 07:48 AM IST
Pele dies aged 82: फुटबॉल विश्वातील 'किंग', पेले यांनी केले 1200 पेक्षा जास्त गोल  title=

Brazilian Football Legend Pele dies aged 82:  ब्राझीलचे दिग्गज् फुटबॉलपटू पेले यांनी वयाच्या 82व्या वर्षी जगाचा निरोप घेतला. (Brazil Footballer Pele) फुटबॉल खेळणे ही कला असेल, तर कदाचित त्यांच्यापेक्षा मोठा कलाकार जगात दुसरा कोणीच झाला नसेल, असे सांगितले जाते. आज मेस्सी आणि किलियन एम्बापे यांच्या नावाची चर्चा असली तरी पेले यांचे नाव आधी घेतले जाते. तीन विश्वचषक विजेतेपद, 784 मान्यताप्राप्त गोल आणि जगभरातील फुटबॉल चाहत्यांसाठी एक प्रेरणा, पेलेने यशाची मोठी गाथा मागे सोडली आहे. ते दीर्घकाळ कॅन्सरशी (Cancer)  झुंज देत होते. गुरुवारी त्यांनी साओ पाउलो येथील आईनस्टाईन रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला.

फुटबॉलचं मैदान गाजवणारा हा खेळाडू कॅन्सरविरोधातील झुंज हरला. पेले हे तीन वेळा फिफा विश्वचषक जिंकणारे एकमेव खेळाडू होते. पेले या नावानं प्रसिद्ध असलेले एडसन अरांतेस डो नासिमेंटो यांचा जन्म 23 ऑक्टोबर 1940 रोजी ब्राझीलच्या मिनास गेराइस राज्यातील ट्रेस कोराकोस इथं झाला होता. पेले यांनी 1958मध्ये ब्राझीलच्या पहिल्या फिफा विश्वचषक विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. तसंच किशोरवयीन असलेल्या पेले यांनी फ्रान्सविरुद्धच्या उपांत्य फेरीत हॅट्ट्रिक केली होती.

पेले यांनी केले 1200 हून अधिक गोल  

पेले (Brazil Footballer Pele) यांनी 1200 हून अधिक गोल केले आहेत. परंतु फिफाने केवळ 784 गोलला मान्यता दिली आहे. क्रीडा जगतातील सर्वात मोठ्या सुपरस्टार्सपैकी एक असलेल्या पेलेच्या लोकप्रियतेला सीमारेषेचे बंधन नव्हते. एडसन अरांतेस डो नासिमेंटो म्हणजेच पेले यांचा जन्म 1940 मध्ये झाला. ते अशा खेळाडूंपैकी एक होते ज्यांनी फुटबॉलची लोकप्रियता उच्चुत्त शिखरावर नेली आणि त्यासाठी मोठी बाजारपेठ निर्माण केली. त्यांची लोकप्रियता इतकी होती की 1977 मध्ये ते कोलकात्यात आले तेव्हा संपूर्ण शहर थांबले होते. 2015 आणि 2018 मध्येही त्यांनी भारताला भेट दिली होती.

17 व्या वर्षी पहिला विश्वचषक खेळला

 Pele Health Update: फुटबॉलचे जादूगार पेले यांची प्रकृती ढासळली; मोठी माहिती समोर!

पेले यांचा जन्म भ्रष्टाचार, लष्करी उठाव, सेन्सॉरशिप आणि दमनकारी सरकारांनी ग्रासलेल्या देशात झाला. तथापि, 17 वर्षीय पेले यांनी 1958 मध्ये आपल्या पहिल्याच विश्वचषकात ब्राझीलची प्रतिमा उजळवून टाकली. स्वीडनमध्ये खेळल्या गेलेल्या स्पर्धेत त्यांनी चार सामन्यांत सहा गोल केले, त्यापैकी दोन अंतिम सामन्यात केले. त्यांनी ब्राझीलला यजमानांवर 5-2 ने विजय मिळवून दिला आणि यशाचा सिलसिला कायम ठेवला. FIFA ने सर्व काळातील महान खेळाडूंपैकी एक म्हणून सूचीबद्ध केलेले, पेले हे राजकारण्यांचे देखील आवडते होते. 1970 च्या विश्वचषकापूर्वी, ब्राझीलच्या सर्वात हुकूमशाही सरकारच्या सर्वात निर्दयी सदस्यांपैकी एक असलेले अध्यक्ष एमिलियो गारास्ताझू मेडिसी यांच्यासोबत ते स्टेजवर दिसले होते.

पेले यांचा खेळ पाहण्यासाठी युद्धही थांबवले

फुटबॉलपटू पेले यांच्या प्रकृतीत सुधारणा

पेले यांची लोकप्रियता खूप होती. 1960 च्या नायजेरियन गृहयुद्धादरम्यान, पेले यांचा सामना पाहता यावा म्हणून विरोधी गटांमध्ये 48 तासांचा युद्धविराम झाला. 1977 मध्ये कॉसमॉसच्या आशिया दौऱ्यावर मोहन बागानच्या निमंत्रणावरुन ते कोलकात्यात आले होते. ते सुमारे अर्धा तास ईडन गार्डन्सवर फुटबॉल खेळले. त्यांचा खेळ 80,000 प्रेक्षकांनी पाहिला. त्यानंतर 2018 मध्ये ते शेवटच्या वेळी कोलकात्यात आले आणि त्यांची क्रेझ तशीच होती.