११ बॉलमध्ये याने संपूर्ण खेळ पालटला आणि विजय खेचून आणला

आयपीएलच्या ११ व्या सीजनचा पहिला रोमहर्षक सामना

shailesh musale Updated: Apr 8, 2018, 11:38 AM IST
११ बॉलमध्ये याने संपूर्ण खेळ पालटला आणि विजय खेचून आणला title=

मुंबई : आयपीएलच्या ११ व्या सीजनचा पहिला सामना खूपच रोमहर्षक ठरला. २ वर्षानंतर आयपीएलमध्ये कमबॅक करणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्सने मुंबईच्या विरोधात 166 रनचं लक्ष्य गाठलं. 16.3 ओव्हरमध्ये चेन्नईने 8 विकेट गमवत 118 रन केले. त्यातच केदार जाधव रिटायर्ड हर्ट झाल्याने चेन्नईच्या चिंता अधिक वाढल्या. 17 व्या ओव्हरमध्ये ड्वेन ब्रावो 19 बॉलमध्ये 29 रनवर खेळत होता. दूसरीकडे 1 रनवर इमरान ताहिर खेळत होता. मुंबई विजयाच्या तोंडावर उभी होती. रोहित शर्माने मिचेलला 18 वी ओव्हर दिली.

18 व्या ओव्हरमध्ये चेन्नईला 47 रनची गरज होती. मॅक्लेघनच्या पहिल्या बॉलवर ताहिरने ब्रावोला स्ट्राईक दिली. यानंतर ब्रावोने असा खेल दाखवला की सगली बाजूच बदलली. 18 व्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर आणि तिसऱ्या बॉलवर त्य़ाने सिक्स मारले. चौथ्या बॉलवर २ रन काढत स्ट्राईक पुन्हा स्वतःकडे ठेवली. त्यानंतर पाचव्या बॉलला एक फोर आणि सहाव्या बॉलवर एक रन काढून पुन्हा स्ट्राईक स्वतःकडे ठेवली.

19 व्या ओव्हरमध्ये चेन्नईला 12 बॉलमध्ये 27 रन हवे होते. रोहितने जसप्रीत बुमराहच्या हातात बॉल दिला. पण ब्रावोने सुरुवातीच्या दोन्ही बॉलवर 2 सिक्स लगावले. तिसऱ्या बॉलवर २ रन काढले. चौथा बॉल स्टंम्पला लागला पण बेल न पडल्याने त्याला जीवनदान मिळालं. पाचव्या बॉलवर त्याने पुन्हा सिक्स मारला. सहाव्या बॉलवर तो आऊट झाला. मुंबईच्य़ा पुन्हा आशा पल्लवीत झाल्या. आता 6 बॉलमध्ये 7 रन हवे होते. दुखापत झालेला केदार जाधव पुन्हा खेळाळला आला आणि एक सिक्स आणि फोर मारत त्याने सामना जिंकवला.

ब्रावोने 30 बॉलमध्ये त्याने 68 रन केले. 3 फोर आणि 7 सिक्स मारत त्याने चेन्नईचा विजय खेचून आणला.