वर्ल्ड कपमध्ये Bumrah शिवाय कसं टीम इंडियाचं कसं होणार? Sachin Tendulkar ने दाखवला हा रस्ता...

सध्या सगळीकडे T20 विश्वचषक 2022 ची क्रेझ आहे. प्रेक्षक या नव्या मॅचसाठी उत्सुक आहेत. 

Updated: Oct 19, 2022, 10:28 PM IST
वर्ल्ड कपमध्ये Bumrah शिवाय कसं टीम इंडियाचं कसं होणार? Sachin Tendulkar ने दाखवला हा रस्ता...  title=

T20 World Cup: सध्या सगळीकडे T20 विश्वचषक 2022 (T20 World Cup) ची क्रेझ आहे. प्रेक्षक या नव्या मॅचसाठी उत्सुक आहेत. लवकरत भारत - पाकिस्तान (IND Vs PAK मॅचही लवकरच किक्रेटप्रेमींच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे आता सगळीकडे T20 विश्वचषकची उत्सुकता आहे आणि वर्ल्डकपच्या चर्चांना उधाण आलं आहे. 

T20 विश्वचषक 2022 चा बिगुल वाजला आहे. प्रेक्षकांना रोजच रोमांचक सामने पाहायला मिळत आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यात 23 ऑक्टोबरला टी-20 (T20 IND Vs PAK Date) विश्वचषक खेळला जाणार आहे. यासाठी टीम इंडियाने जोरदार तयारी केली आहे. भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे टी-20 विश्वचषकातून बाहेर पडला आहे. आता क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकरनं दावा केला आहे की बुमराहची अनुपस्थिती टीम इंडियातील ही व्यक्ती भरून काढू शकेल. 

आणखी वाचा - Aryan आणि Suhana Khan खानला पाहून नेटकऱ्यांचा संताप; 'एअरपोर्टवर...'

सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar Interview) दिलेल्या एका खास मुलाखतीत सांगितले की, "बुमराहची अनुपस्थिती हे टीम इंडियासाठी मोठे नुकसानचं आहे कारण आपल्याला चांगल्या स्ट्राईक गोलंदाजची गरज आहे. एक वेगवान गोलंदाज जो फलंदाजांवर वर्चस्व गाजवू शकतो आणि विकेट घेऊ शकतो अश्या खेळाडूचीही गरज आहे आणि हे शमीनं सिद्ध केले आहे आणि त्यामुळे तो बुमराहच्या जागी एक चांगला पर्याय दिसतो आहे.' सचिन तेंडुलकरला वाटते की जसप्रीत बुमराहची अनुपस्थितीत त्याच्याजागी टी-20 विश्वचषकात मोहम्मद शमी (Mohammad Shammi) आपल्या कौशल्याने त्यांची कमतरता भरून काढू शकतो.

मोहम्मद शमी हा एक उत्कृष्ट खेळाडू आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यात त्याने एका षटकात तीन विकेट घेतल्या होत्या आणि फक्त चार धावा केल्या.  

आणखी वाचा - गव्हापासून नाही तर चण्याच्या डाळीच्या पोळ्या ठरतील आरोग्यदायी... पाहा फायदे

भारताचा महान फलंदाज सचिन तेंडुलकर युवा अर्शदीप सिंगच्या (Arshdeep Singh) गोलंदाजीने खूप प्रभावित झाला होता. तो म्हणाला, 'अर्शदीपने खूप अपेक्षा वाढवल्या आहेत. मी त्याच्यामध्ये जे काही पाहिले, ते पाहून मला प्रचंड आनंद झाला.  सचिन तेंडुलकर पुढे म्हणाला, 'मला सर्वात चांगली गोष्ट आवडते की जर अर्शदीप सिंगची रणनीती असेल तर तो त्यासाठी प्रामाणिक राहतो. या फॉरमॅटमध्ये ते खूप महत्वाचे आहे, असं तो म्हणाला.