ख्रिस्तियानो रोनाल्डोवर असलेल्या बलात्कार प्रकरणात मोठी घडामोड!

 20118 मध्ये, या मॉडेलने MeToo चळवळीने प्रेरित होऊन रोनाल्डोच्या विरोधात उघडपणे बोलण्याचा निर्णय घेतला. 

Updated: Oct 9, 2021, 09:27 AM IST
ख्रिस्तियानो रोनाल्डोवर असलेल्या बलात्कार प्रकरणात मोठी घडामोड! title=

अमेरिका : अमेरिकेच्या एका न्यायाधीशाने स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोविरुद्धची सिविल रेप केस बरखास्त करण्याची शिफारस केली आहे. रोनाल्डोवर माजी मॉडेल कॅथरीन मॉर्गेनने लास वेगासमधील एका हॉटेलमध्ये 2009 मध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप केला होता. पोर्तुगालचा स्टार खेळाडू रोनाल्डोने लैंगिक छळाचे आरोप फेटाळले होते. 

कॅथरीन मायोर्गाने रोनाल्डोविरोधात सिविल तक्रार दाखल केली. यावेळी तिने नुकसान भरपाईचीही मागणी केली होते. मायोर्गाने 2010 मध्ये रोनाल्डोसोबत न्यायालयाबाहेर याबाबत तोडगा काढलयाचा दावा करण्यात आला होता. 

यानंतर, 20118 मध्ये, या मॉडेलने MeToo चळवळीने प्रेरित होऊन रोनाल्डोच्या विरोधात उघडपणे बोलण्याचा निर्णय घेतला. मँचेस्टर युनायटेड स्टार खेळाडूविरुद्धचा खटला दोन वर्षांपूर्वी वगळण्यात आला होता. त्यावेळी वकिलांनी शिक्षेची कोणतीही शक्यता नसल्याचे सांगितले.

रोनाल्डोने 2010 मध्ये मायोर्गाला $ 3.75 लाख (सुमारे 2.81 कोटी रुपये) दिले होते.मात्र, पैसे घेतल्यानंतरही मायोरगाने लास वेगासमध्ये खटला दाखल केला आणि ज्यावेळी हे ठरलं तेव्हा ती मानसिकदृष्ट्या ठीक नसल्याचं सांगितले. त्याच वर्षी, मायोर्गाने रोनाल्डो कडून $56 दशलक्ष (सुमारे 420 कोटी रुपये) ची मागणी केली.

या आठवड्यातील सुनावणीदरम्यान, दंडाधिकारी न्यायाधीश डॅनियल अल्ब्रेगेट्स यांनी रोनाल्डोचा खटला बंद करण्याचा प्रस्ताव मंजूर करण्याची शिफारस केली. आता न्यायाधीश अल्ब्रेगेटच्या शिफारशीचे स्वतंत्र न्यायाधीशांकडून समीक्षा केली जाईल, जे प्रत्यक्षात या खटल्याची सुनावणी करत आहे. रोनाल्डोचे वकील पीटर क्रिस्टियनसन यांनी या शिफारशीचं स्वागत केलंय.