IND vs AUS: चौथ्या T20I पूर्वी टीम इंडियामध्ये मोठा बदल; 'या' घातक खेळाडूची होणार एन्ट्री

India vs Australia: सिरीजमधील चौथा सामना शुक्रवारी खेळवला जाणार असून या सामन्यात एका धाकड प्लेअरची एन्ट्री होणार आहे. 

सुरभि जगदीश | Updated: Nov 30, 2023, 12:42 PM IST
IND vs AUS: चौथ्या T20I पूर्वी टीम इंडियामध्ये मोठा बदल; 'या' घातक खेळाडूची होणार एन्ट्री title=

India vs Australia: सध्या भारत विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये 5 सामन्यांची टी-20 सिरीज सुरु आहे. या सिरीजमधील 3 सामने झाले असून पहिल्या दोन सामन्यांमध्ये टीम इंडियाला विजय मिळवणं शक्य झालंय. मात्र तिसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने कमबॅक करत भारताचा 5 विकेट्सने पराभव झाला. या सिरीजमधील चौथा सामना शुक्रवारी खेळवला जाणार असून या सामन्यात एका धाकड प्लेअरची एन्ट्री होणार आहे. 

सिरीज जिंकण्यावर असणार भारताचं लक्ष

रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंह इंटरनॅशनल स्टेडिययमध्ये चौथा टी-20 सामना रंगणार आहे. यावेळी चौथ्या सामन्यात विजय मिळवून टीम इंडिया सिरीज जिंकण्यासाठी प्रयत्न करणार आहे. हा सामना जिंकण्यासाठी टीम इंडियाच्या ताफ्यात एका खास खेळाडूची एन्ट्री होणार आहे. 

'या' खेळाडूची होणार प्लेईंग 11 मध्ये एन्ट्री

पहिल्या 3 सामन्यांसाठी ऋतुराज गायकवाडला उपकर्णधार पदाची धुरा सोपवण्यात आली होती. मात्र पुढील 2 सामन्यांमध्ये उपकर्णधार पदाची धुरा श्रेयस अय्यरवर सोपवण्यात आली आहे. याचाच अर्थ चौथ्या सामन्यासाठी श्रेयस अय्यरचा टीममध्ये समावेश होणार आहे.

श्रेयस अय्यर चौथ्या T20 साठी टीम इंडियामध्ये कमबॅक होणार आहे. या सामन्यात अय्यर टीमचा उपकर्णधार असेल. त्याचबरोबर कर्णधारपदाची जबाबदारी सूर्यकुमार यादव सांभाळतोय. अय्यरची टी-20 मध्ये चांगली कामगिरी आहे.

2023 च्या वनडे वर्ल्डकपमध्ये अय्यरने शतकंही झळकावलं होतं. याशिवाय वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत श्रेयसच्या नावाचा समावेश होता. अय्यरने या स्पर्धेत 66.25 च्या सरासरीने 530 रन्स केले होते. सर्वाधिक रन्स करणाऱ्या फलंदाजांमध्ये तो सातव्या क्रमांकावर होता. आता ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या टी-20 सामन्यात अय्यरच्या कामगिरीवर चाहत्यांचं लक्ष असणार आहे. 

कशी असणार भारताची संभाव्य Playing XI

ऋतुराज गायकवाड, यशस्वी जयस्वाल, इशान किशन (विकेटकीपर), श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, दीपक चहर, रवी बिश्नोई, आवेश खान आणि प्रसिद्ध कृष्णा.