मुंबई : आयपीएलचे सामने 26 मार्चपासून सुरू होत आहे. चेन्नई विरुद्ध कोलकाता पंधराव्या हंगामातील पहिला सामना होणार आहे. या सामन्यापूर्वी काही मोठ्या घडामोडी समोर आल्या आहेत. चेन्नई संघाचं कर्णधारपद महेंद्रसिंह धोनीनं सोडलं आहे. रविंद्र जडेजा नवा कर्णधार असणार आहे.
दुसरीकडे दीपक चाहर खेळणार की नाही याबाबत सध्या प्रश्नचिन्ह आहे. तर दुसरीकडे पहिल्या सामन्यात मोईन अली खेळणार नाही त्यामुळे चेन्नईचं टेन्शन वाढलं आहे. आता चेन्नईचं कर्णधारपद धोनीनं सोडल्यानं संघात नाराजी आहे.
धोनीने चेन्नईचं नेतृत्व सोडण्याचा निर्णय घेतला आहे. चेन्नईने ट्विटद्वारे याबाबतची माहिती दिली आहे. धोनीने तडकाफडकी घेतलेल्या या निर्णयामुळे धोनीच्या चाहत्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे.
अशी आहे चेन्नईची टीम (CSK Team 2022 Players List)
रवींद्र जडेजा (कॅप्टन), महेंद्र सिंह धोनी, मोईन अली, ऋतुराज गायकवाड, ड्वेन ब्रावो, अंबाती रायडू, केएम आसिफ, तुषार देशपांडे, दीपक चाहर, शिवम दुबे, महेश दीक्षाना, राजवर्धन हंगरकेकर, सिमरजीत सिंह, डेवोन कॉनवे, ड्वेन प्रिटोरियस, मिशेल सेंटनर, एडम मिल्ने, सुभ्रांशु सेनापति, मुकेश चौधरी आणि प्रशांत सोलंकी.
धोनीने आयपीएलमध्ये सर्वाधिक काळ चेन्नईचं नेतृत्व केलं. तर काही मोसमासाठी पुण्याची कॅप्टन्सी केली. धोनीने आयपीएलच्या इतिहासात एकूण 204 सामन्यांमध्ये नेतृत्व केलंय. यामध्ये त्याने आपल्या कॅप्टन्सीत 121 मॅचेसमध्ये विजय मिळवून दिला. धोनीची विजयी टक्केवारी ही 59.60 टक्के इतकी राहिली आहे.
धोनी आयपीएलच्या इतिहासातील रोहित शर्मानंतर दुसरा यशस्वी कर्णधार आहे. धोनीने चेन्नईला एकूण 4 वेळा आयपीएल ट्रॉफी मिळवून दिली आहे. धोनीने चेन्नईला 2010, 2011, 2018 आणि 2021 मध्ये आयपीएलचं विजेतेपद मिळवून दिलं होतं.