IPL 2024 : गेली अनेक वर्ष मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद यशस्वीरित्या सांभाळणाऱ्या रोहित शर्माला (Rohit Sharma) नारळ देण्यात आला. हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचा आगामी (IPL 2024) हंगामात कर्णधार असेल, अशी घोषणा पलटणकडून (Mumbai Indians) करण्यात आली. त्यामुळे मुंबई इंडियन्सचे फॅन्स नाराज असल्याचं सांगितलं जातंय. अशातच मुंबई इंडियन्सने यंदाच्या हंगामात काही नवख्या खेळाडूंवर डाव आखलाय. मात्र, आयपीएल तोंडावर असताना मुंबई इंडियन्सला मोठा धक्का बसला आहे. श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज दिलशान मदुशंका आयपीएलचे सुरूवातीचे काही सामने खेळणार नसल्याची माहिती समोर आली आहे. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने याबद्दल माहिती दिली.
मदुशंका जखमी
बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात मधुशंका जखमी झाला होता. एमआरआय स्कॅनमध्ये हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीची पुष्टी झाल्याचे श्रीलंका क्रिकेटनं सांगितलंय. यामुळे मदुशंका पहिल्या दोन सामन्यांमधून बाहेर राहू शकतो आणि तो 1 एप्रिल रोजी होणाऱ्या राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यासाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
मुंबईने पाण्यासारखा पैसा ओतला
मागील वर्षी म्हणजेच डिसेंबर 2023 मध्ये झालेल्या खेळाडूंच्या लिलावात मुंबईने 4.6 कोटी रुपये देऊन आयपीएल 2024 साठी आपल्या संघात मधुशंकाचा समावेश केला होता. जसप्रीत बुमराह, जेसन बेहरेनडॉर्फ आणि गेराल्ड कोएत्झी यांच्यासह मधुशंका मुंबईच्या वेगवान गोलंदाजीचा एक भाग आहे. त्यामुळे आता मुंबईला जसप्रीत बुमराह आणि जेसन बेहरेनडॉर्फ यांच्यावर अवलंबून रहावं लागेल, अशी शक्यता आहे.
मुंबई इंडियन्सने कायम ठेवलेले खेळाडू - रोहित शर्मा, देवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, इशान किशन, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, विष्णू विनोद, अर्जुन तेंडुलकर, शम्स मुलानी, नेहल वढेरा, कुमार कार्तिकेय, पियुष चावला, आकाश मधवाल, जेसन बेहरेनडॉर्फ.
MI ची संभाव्य प्लेइंग इलेव्हन - रोहित शर्मा, इशान किशन (WK), तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, टीम डेव्हिड, रोमॅरियो शेफर्ड, जेराल्ड कोएत्झी, पियुष चावला, जसप्रीत बुमराह, नुवान थुसारा.
इम्पॅक्ट प्लेयर कोण?
नेहल वढेरा, आकाश मधवाल, दिलशान मदुशंका, जेसन बेहरेनडॉर्फ, मोहम्मद नबी
IPL 2024 साठी मुंबई इंडियन्सचा संघ -
हार्दिक पंड्या (क), रोहित शर्मा, देवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, इशान किशन, एन. तिलक वर्मा, टीम डेव्हिड, विष्णू विनोद, अर्जुन तेंडुलकर, शम्स मुलानी, नेहल वढेरा, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय, पियुष चावला, आकाश मधवाल, जेसन बेहरेनडॉर्फ, रोमॅरियो शेफर्ड, जेराल्ड कोएत्झी, दिलशान मदुशंका, श्रेयस गोपाल, नुवान तुषारा, नमन धीर, अंशुल कंबोज, मोहम्मद नबी, शिवालिक शर्मा.