दिल्ली : सध्या लग्नसराईचा काळ सुरू आहे. सागरिका आणि झहीर खान पाठोपाठ भुवनेश्वर कुमार आणि नुपूर नागरदेखील लग्नबंधनात अडकले आहेत.
दिल्ली रोड येथील हॉटेल ब्रावुरामध्ये २३ नोव्हेंबर रोजी भुवनेश्वर कुमार लग्नबंधनात अडकला. यावेळेस लाल शेरवानी आणि पगडी घातलेल्या भुवनेश्वरकडे लक्ष वेधण्याचे अजून एक प्रमुख कारण म्हणजे त्यांच्या गळ्यातील ५०० रूपयांच्या नोटांची माळ !
मीडीया रिपोर्ट्सनुसार, भुवनेश्वरच्या गळ्यातील नोटांचे मूल्य सुमारे सव्वा पाच लाख होते. भुवनेश्वरने ही माळ काहीवेळापुरतीच घातली होती.
भुवनेश्वरचे लग्न धामधुमीमध्ये पार पडले. यामध्ये सारे धार्मिक विधी आणि रीतिरिवाज करण्यात आले. त्यानुसार वरातही गाजतवाजत आली. यावेळेस भुवनेशवरच्या घरातील नातेवाईक, मित्रमंडळी धमाल मस्ती करताना दिसले.
सहा डिसेंबरला दिल्लीमध्ये नुपूर आणि भुवनेश्वरच्या लग्नाचे रिसेप्शन आहे. पहा भुवनेश्वर कुमार आणि नुपूर नगरच्या लग्नाचे खास फोटो