दक्षिण आफ्रिकेच्या यशस्वी सीरिजनंतर भुवनेश्वर-शिखरला फायदा

दक्षिण आफ्रिकेच्या भूमीत भारतानं पहिल्यांदा टी-20 सीरिज जिंकली.

Shreyas deshpande श्रेयस देशपांडे | Updated: Feb 25, 2018, 08:43 PM IST
दक्षिण आफ्रिकेच्या यशस्वी सीरिजनंतर भुवनेश्वर-शिखरला फायदा  title=

दुबई : दक्षिण आफ्रिकेच्या भूमीत भारतानं पहिल्यांदा टी-20 सीरिज जिंकली. या विजयामध्ये शिखर धवन आणि भुवनेश्वर कुमारनं महत्त्वाची भूमिका बजावली. ३ टी-20 मॅचच्या सीरिजमध्ये शिखर धवननं १४३ रन्स केले. या सीरिजमध्ये सर्वाधिक रन्स करणारा खेळाडू शिखर धवन ठरला आहे. तर सीरिजमध्ये ७ विकेट घेणाऱ्या भुवनेश्वर कुमारला मॅन ऑफ द सीरिज देऊन गौरवण्यात आलं.

या यशस्वी कामगिरीचा शिखर धवन आणि भुवनेश्वरला फायदा झाला आहे. आयसीसी टी-20 क्रमवारीमध्ये शिखर धवननं १४ स्थानांची झेप घेतली आहे. त्यामुळे शिखर धवन आता २८व्या क्रमांकावर पोहोचला आहे. धवनची ही टी-20मधली सर्वोत्तम क्रमवारी आहे. तर भुवनेश्वर कुमार बॉलरच्या यादीमध्ये १२व्या क्रमांकावर पोहोचलाय.

आयसीसी टी-20 टीमच्या क्रमवारीमध्ये भारताला एका अंकाचा फायदा मिळाला आहे. तर दक्षिण आफ्रिकेनं एक अंक गमावला आहे. पण भारत तिसऱ्या आणि दक्षिण आफ्रिका सातव्या क्रमांकावर कायम आहे. १२६ पॉईंट्स असलेली पाकिस्तान पहिल्या क्रमांकावर कायम आहे. 

बॅट्समनच्या यादीमध्ये न्यूझीलंडचा कॉलीन मुन्रो पहिल्या क्रमांकावर आहे. तर भारताचा कॅप्टन विराट कोहली सहाव्या क्रमांकावर आणि लोकेश राहुल आठव्या क्रमांकावर आहे. बॉलरच्या यादीमध्ये वनडे प्रमाणेच टी-20मध्येही अफगाणिस्तानचा राशिद खान पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. भारताचा जसप्रीत बुमराह पाचव्या क्रमांकावर आहे.