क्रीडा मंत्रीच म्हणाला मैदानावर I LOVE YOU, अख्खं स्टेडिअम चक्रावलं

क्रीडा मंत्र्यांनेच भर मैदानात आय लव्ह यू म्हटले आहे. एका  क्रीडा मंत्र्यांने असं कृत्य करण्याची ही पहिलीच वेळ होती.

Updated: Jun 16, 2022, 04:44 PM IST
 क्रीडा मंत्रीच म्हणाला मैदानावर I LOVE YOU, अख्खं स्टेडिअम चक्रावलं title=

मुंबई : क्रिकेटच्या मैदानात अनेक खेळाडूंनी अथवा प्रेक्षकांनी गर्लफ्रेंडला प्रपोज केल्याच्या घटना आपण टीव्हीवर पाहिल्या असतील. मात्र या घनटेत थेट क्रीडा मंत्र्यांनेच भर मैदानात आय लव्ह यू म्हटले आहे. एका  क्रीडा मंत्र्यांने असं कृत्य करण्याची ही पहिलीच वेळ होती. या घटनेने क्रिकेट विश्वात अनेकांच्या भूवय्या उंचावल्या आहेत. (bengal sports minister manoj tiwari heat century special message for wife ranji trophy 2022)

आंतरराष्ट्रीय सामन्यासह भारतात संध्या रणजी ट्रॉफीचे सामने सुरु आहेत. कर्नाटकच्या अलूर येथे मध्य प्रदेश विरुद्ध बंगालमध्ये रंगलेल्या सामन्यात एक वेगळीच घटना घडली. बंगालचे क्रीडा मंत्री मनोज तिवारी यांनी थेट जर्सीतला पेपर मैदानात झळकवला. या पेपरवर आय लव्ह यू लिहले होते.
 
मनोज तिवारी रणजी ट्रॉफीमध्ये चमकदार कामगिरी करत आहेत. मध्य प्रदेश विरुद्ध  झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात मनोज तिवारीने 12 चौकारांसह 102 धावांची शानदार खेळी केली. मनोज तिवारीच्या फर्स्ट क्लास कारकिर्दीतील हे २९वे शतक होते. त्याच्या खेळीमुळे बंगालचा संघ २७३ धावांचा आकडा गाठू शकला.

सध्या सुरू असलेल्या रणजी ट्रॉफी हंगामातील मनोज तिवारीचे हे सलग दुसरे शतक आहे. तिवारीने उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात झारखंडविरुद्धही १३६ धावा केल्या होत्या.

मैदानावर पेपर झळकावला 

मनोजने शतक झळकावल्यानंतर एक पेपर झळकावला. या पेपरमध्ये लव्ह हार्ट बनवण्यात आले होते.तसेच आय लव्ह यू असा मजकूर लिहत पत्नी सुष्मिता आणि मुलांचे नावही लिहिले होते. हा फोटो सध्या  सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

वैयक्तिक आयुष्य
मनोज तिवारीने 2013 मध्ये सुष्मिता रॉयसोबत लग्न केले. दोघांनी लग्नाआधी जवळपास सात वर्षे एकमेकांना डेट केले होते. सुष्मिता अनेकवेळा मैदानावर मनोजला चीअर करताना दिसली आहे. मनोज तिवारी भारतासाठी एकूण 15 सामन्यांमध्ये दिसला, ज्यामध्ये तो जास्त कामगिरी करू शकला नाही.