लखनऊला विजय मिळवून देणारा Avesh Khan 'त्या' कृत्यामुळे फसला; BCCI ने घेतली एक्शन

लखनऊ विरूद्ध बंगळूरूचा सामना चाहत्यांसाठी श्वास रोखून धरणारा होता. या सामन्यामध्ये लखनऊला शेवटच्या बॉलवर एका रनची गरज होती. 

Updated: Apr 11, 2023, 04:33 PM IST
लखनऊला विजय मिळवून देणारा Avesh Khan 'त्या' कृत्यामुळे फसला; BCCI ने घेतली एक्शन title=

BCCI takes action against Avesh Khan : सोमवारी बंगळूरूच्या चिन्नस्वामी स्टेडियममध्ये लखनऊ सुपर जाएंट्स (Lucknow Super Giants) विरूद्ध रॉयल चॅलेंजर बंगळूरू (Royal Challengers Bangalore) यांच्यामध्ये सामना रंगला होता. शेवटच्या क्षणापर्यंत उत्कंठा वाढवण्याऱ्या या सामन्यामध्ये लखनऊचा एका विकेटने विजय झाला. शेवटच्या बॉलवर एक रन काढून लखनऊच्या डग आऊटमध्ये एकच जल्लोष पहायला मिळाला. यावेळी टीमला जिंकवून दिलेल्या आवेश खान (Avesh Khan) ची एका कृत्यामुळे फार चर्चा होतेय. दरम्यान आवेशचं हे कृत्य त्याला महागात पडलेलं दिसतंय. (Avesh reprimanded for throwing helmet)

लखनऊ विरूद्ध बंगळूरूचा सामना चाहत्यांसाठी श्वास रोखून धरणारा होता. या सामन्यामध्ये लखनऊला शेवटच्या बॉलवर एका रनची गरज होती. हर्षल पटेल गोलंदाजी करत असताना आवेश खान स्ट्राईकवर होता. शेवटच्या बॉलवर आवेशला कोणताही शॉट खेळता आला नाही, मात्र विकेटकीपर दिनेश कार्तिकने केलेल्या मिसफिल्डींगमुळे एक रन काढण्यात फलंदाजांना यश आलं. 

आनंदाच्या भरात हेल्मेट फेकलं

दरम्यान या एका रनमुळे लखनऊ सुपर जाएंट्सचा विजय झाला. यामुळे रन काढलेला आवेश फार खूश झाला आणि उत्साहाच्या भरात त्याने हेल्मेट काढूल जमिनिवर आदळलं. त्याच्या या कृत्यामुळे BCCI ने त्याला वॉर्निंग दिली आहे.

BCCI ने लगावली फटकार

लखनऊच्या विजयानंतर आवेश खानने हेल्मेट जमिनीवर आदळलं, दरम्यान याबाबत बीसीसीआयने आवेश खानला फटकारलंय. यावेळी आयपीएलच्या वेबसाइटवर दिलेल्या निवेदनात असं म्हटलंय की 'आवेश खानने हॅल्मेट फेकणं हे नियमांचं उल्लंघन आहे. हे प्रकरण लेव्हल 1 आयपीएल आचारसंहितेच्या अधिनियम 2.2 अंतर्गत येतं. 

दरम्यान याबाबत बीसीसीआयने आवेश खानला देखील खडसावलंय. आवेशने यासंदर्भात त्याची चूक मान्य केलीये. मुख्य म्हणजे आवेशची ही पहिलीच चूक होती, त्यामुळे बीसीसीआयने त्याला केवळ वॉर्निंग दिलीये. शिवाय यापुढे अशी चूक न करण्याबाबत देखील सांगितलंय. 

आरसीबी कर्णधाराला 12 लाखांचा दंड

लखनऊ सुपर जाएंट्सविरूद्धचा सामना गमावल्याचं दुःख असताना आरसीबीला अजून एक मोठा धक्का बसला आहे. Royal Challengers Bangalore चा कर्णधार फाफ डू प्लेसिसला (Faf du Plessis) स्लो ओव्हर रेट ठेवल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला आहे. स्लो ओव्हर रेट (Slow Over Rate) ठेवल्याबद्दल दोषी आढळल्याने त्याला 12 लाख रुपयांचा (12 lack) दंड भरावा लागणार आहे.