क्रीडा विश्वाला मोठा धक्का, माजी क्रिकेटर-BCCIचे रेफरी यांचं कोरोनामुळे निधन

सौराष्ट्रचे माजी वेगवाग गोलंदाज आणि भारतीय क्रिकेट बोर्डचे रेफरी राजेंद्रसिंह जडेजा यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. 

Updated: May 16, 2021, 04:17 PM IST
क्रीडा विश्वाला मोठा धक्का, माजी क्रिकेटर-BCCIचे रेफरी यांचं कोरोनामुळे निधन title=

मुंबई: कोरोनातून सावर असणारे काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांच्या निधनानं काँग्रेसमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत क्रीडा विश्वातील काही खेळाडूंचे वडीलही हिरावले आहेत. आता क्रिकेट विश्वातून एक मोठी बातमी येत आहे. सौराष्ट्रचे माजी वेगवाग गोलंदाज आणि भारतीय क्रिकेट बोर्डचे रेफरी राजेंद्रसिंह जडेजा यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. 

राजेंद्रसिंह जडेजा यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांचं निधन झालं आहे. त्यांच्या जाण्यामुळे क्रीडा विश्वात मोठी पोकळी निर्माण झाल्याची भावना सर्वांनी व्यक्त केली आहे. 

राजेंद्रसिंह जडेजा राइट हॅण्ड फास्ट बॉलर होते. याशिवाय एक चांगला अष्टपैलू खेळाडू म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं.  फस्ट क्लास श्रेणीतील 50 तर आणि 11 लिस्ट ए सामन्यात त्यांनी क्रमकश: 1536 आणि 104 धावा तर 134 आणि 14 विकेट्स आपल्या नावावर केल्या होत्या. 

जडेजा यांनी 53 प्रथम श्रेणी 18 लिस्ट ए आणि 34 टी 20 सामन्यांमध्ये BCCIकडून अधिकारीक रेफरी म्हणून राहिले होते. याशिवाय सौराष्ट्र क्रिकेट संघच्या निवड समितीत, कोच आणि 
टीम मॅनेजमेंटमध्ये देखील त्यानी काम केलं होतं. 

एससीएचे अध्यक्ष जयदेव शहा यांनीही त्यांच्या मृत्यूवर शोक व्यक्त करत म्हटले आहे की, "जागतिक क्रिकेटसाठी हे मोठे नुकसान आहे." राजेंद्र सर मला भेटलेल्या सर्वात कौशल्यपूर्ण आणि बुद्धीमान लोकांपैकी एक होते. मुख्य प्रशिक्षक, व्यवस्थापक आणि मार्गदर्शकाखाली मी बरेच सामने खेळले हे माझे भाग्य होते.