आयपीएलमध्ये स्थान न मिळालेल्या या क्रिकेटरला बीसीसीआयने दिले गिफ्ट

बीसीसीआयने आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघांची घोषणा केलीये. यात भारत अ आणि चार वनडे सामन्यांसाठी संघाची घोषणा झालीये. 

Updated: May 9, 2018, 04:58 PM IST
आयपीएलमध्ये स्थान न मिळालेल्या या क्रिकेटरला बीसीसीआयने दिले गिफ्ट title=

बंगळूरु : बीसीसीआयने आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघांची घोषणा केलीये. यात भारत अ आणि चार वनडे सामन्यांसाठी संघाची घोषणा झालीये. या संघात अनेक नव्या चेहऱ्यांना स्थान दिलेय. यंदाच्या आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या युवा क्रिकेटर्सनाही संघात स्थान दिलेय. श्रेयस अय्यरकडे भारत अ संघाचे कर्णधारपद देण्यात आलेय. या निवडीत सर्वाधिक आश्चर्यचकित करणारे नाव म्हणजे रजनीश गुरबानी. रणजी ट्रॉफीमध्ये दमदार कामगिरी केल्यानंतरही रजनीशला आयपीएलमध्ये स्थान देण्यात आले नव्हते. आयपीएलमध्ये त्याला कोणी खरेदीदार मिळाला नाही. विदर्भचा स्विंग गोलंदाज रजनीशने २०१७मध्ये रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये दिल्लीविरुद्ध हॅटट्रिक करताना एकूण ८ विकेट मिळवल्या होत्या. त्याला मॅन ऑफ दी मॅचचा पुरस्कार देण्यात आला होता. 

स्थानिक स्तरावर चांगली कामगिरी

२८ जानेवारी १९९३मध्ये नागपूरमध्ये जन्मलेला रजनीश विदर्भकडून रणजीमध्ये खेळतो. फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये ११ सामन्यांमधील २० डावांत त्याने ५६ विकेट मिळवल्यात. यात त्याने एकदा ६८ धावांत ७ विकेट मिळवलेत. ही त्याची सर्वोत्तम कामगिरी राहिलीये. २०१७-१८मध्ये विदर्भला मिळालेल्या यशात रजनीशचा मोठा वाटा होता.

भारत अ टीम ट्राय सीरिजसाठी 
श्रेयस अय्यर ( कर्णधार ), पृथ्वी शॉ, मयंक अग्रवाल, शुभमान गिल, हनुमा विहारी, संजू सैमसन, दीपक हुड्डा, ऋषभ पंत, विजय शंकर, के. गौतम, अक्षर पटेल, कृणाल पंड्या, प्रसिद्ध कृष्ण, दीपक चाहर, खलील अहमद, शारदुल ठाकुर. 

भारत अ ची टीम चार वनडे सामन्यांसाछी
करुण नायर (कर्णधार), आर. समर्थ, मयंक अग्रवाल, अभिमन्यु ईश्वरन, पृथ्वी शॉ, हनुमा विहारी, अंकित बावने, विजय शंकर, के . एस . भारत, जयंत यादव, शाहबाज नदीम, अंकित राजपूत, मोहम्मद सिराज, नवदीप सैनी, रजनीश गुरबानी.