Chetan Sharma Resign BCCI Chief Selector : भारतीय क्रिकेट संघाच्या (BCCI) निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा (Chetan Sharma) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. झी मिडियाच्या स्टिंग ऑपरेशनमुळे (Zee Media sting operation) चेतन शर्मा वादात आले होते. चेतन शर्मा यांनी आपला राजीनामा (Chetan Sharma Resign ) भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे सचिव जय शाह (Jay Shah) यांच्याकडे सुपूर्द केलाय. त्यामुळे आता बीसीसीआयमध्ये चाललंय काय? असा सवाल आता उपस्थित होताना दिसत आहे.
झी मिडियाच्या स्टिंग ऑपरेशनमधून एकामागून एक गौप्यस्फोट पाहायला मिळाले होते. या स्टिंग ऑपरेशनमुळे क्रिडाविश्वात गोंधळ उडाल्याचं पहायला मिळालं होतं. बीसीसीआय चेतन शर्मा यांच्यावर कारवाई (Chetan Sharma Resign BCCI Chief Selector) करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. अशातच आता चेतन शर्मा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. गेल्या 40 दिवसात दोन वेळा त्यांच्याकडून हे पद गेल्याचं पहायला मिळतंय.
चेतन शर्मा यांना पुन्हा चीफ सिलेक्टरपदी (BCCI Chief Selector) संधी देण्यात आली होती. टीम इंडियाच्या खराब प्रदर्शनानंतर त्यांना पुन्हा का संधी देण्यात आली? असा सवाल उपस्थित होताना दिसत होता. त्याची कारणं पुढीलप्रमाणे...
टी-ट्वेंटी वर्ल्ड कप (T-20 World Cup) आणि आशिया कपमध्ये (Asia Cup) खराब कामगिरीनंतर बीसीसीआयने टोकाचे निर्णय घेतले आणि सिलेक्शन समिती बरखास्त केली. त्यावेळी चेतन शर्मा यांना देखील काढून टाकण्यात आलं होतं. मात्र, त्यांच्या जागी चांगला पर्याय नसल्याने बीसीसीआयने त्यांना पुन्हा संधी दिली आहे.
चेतन शर्मा चीफ सिलेक्टर पदावर आल्यापासून टीम इंडियामध्ये युवा खेळाडूंचा वावर वाढलाय. चेतन शर्मा यांनी युवा खेळाडूंना संधी दिलीये. अर्शदीपला वर्ल्ड कप खेळवण्याचा त्यांचा निर्णय सर्वांना आश्चर्यात टाकणारा होता.
बीसीसीआय जगातील सर्वात मोठा क्रिकेट बोर्ड असला तरी चीफ सिलेक्टरला जास्त पगार दिला जात नाही. चेतन शर्मा यांना फक्त 25 लाख रुपये वर्षाला दिला जात होता. त्यामुळे त्या पदासाठी जास्त अर्जदार येत नव्हते. त्यामुळे बीसीसीआयने पुन्हा चेतन शर्मा यांच्यावर विश्वास दाखवला.