IPL2021 साठी BCCI ने बदलले 5 नियम, 9 एप्रिलपासून सामने

 खेळामधील 5 नियम बदलल्यानं संघांवर थेट त्याचा परिणाम होणार आहे. 

Updated: Mar 31, 2021, 05:27 PM IST
IPL2021 साठी BCCI ने बदलले 5 नियम, 9 एप्रिलपासून सामने title=

मुंबई: 9 एप्रिलपासून IPLच्या हंगामाला सुरुवात होत आहे. 30 मे रोजी शेवटचा सामना खेळवला जाणार आहे. IPL सुरू होण्यासाठी BCCI ने काही नियम बदलले आहेत. कोरोनाचे नियम तर संघाना पाळावेच लागणार आहेत त्याशिवाय खेळामधील 5 नियम बदलल्यानं संघांवर थेट त्याचा परिणाम होणार आहे. BCCIने कोणते नियम बदलले आहेत आणि नवीन नियम काय आहे जाणून घेऊया.

90 मिनिटांत संपवावा लागणार सामना
नव्या नियमानुसार आता 90 मिनिटांत 20 ओव्हर पूर्ण करणं बंधनकारक असणार आहे. फलंदाजी करणारा संघ जर टाइमपास करत राहिला तर त्याचा फटका गोलंदाजी करणाऱ्या संघाला बसू शकतो. त्यांची फलंदाजीची संधी येईल त्यावेळी वेळ कमी करण्यात येणार असल्याची ताकीद बीसीसीआयकडून देण्यात आली आहे. त्यामुळे सामना ठरवून दिलेल्या वेळेतच पूर्ण करण्याचा नियम बदलला आहे.

सॉफ्ट सिग्नल नाही
इंग्लंड विरुद्धच्या खेळल्या गेलेल्या सामन्या दरम्यान सॉफ्ट सिग्नलवरून खूप वादंग निर्माण झाला होता. सॉफ्ट सिग्नल IPLमध्ये मान्य नसेल. हटवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

शॉर्ट रन
शॉर्ट रन काढल्यानंतर त्याबाबत जर अक्षेप घेतला गेला तर तो निर्णय थर्ड अंपायरकडे जाणार आहे. थर्ड अंपायर जो निर्णय देईल तो अंतिम असणार आहे. 

नो बॉल
नो बॉलचा निर्णयही थर्ड अंपायरकडे सोपवण्यात आला आहे. थर्ड अंपायरनं दिलेला निर्णय हाच अंतिम मानण्यात येईल.

सुपर ओव्हर
सामना टाय झाल्यानंतर दिलेल्या वेळेतच सुपरओव्हर पूर्ण करावी लागणार आहे. त्यासाठी कोणताही वेगळा ज्यादा वेळ दिला जाणार नाही. 

Tags: