BCCI Central Contracts 2022-23: टीम इंडिया (Team India) सध्या बांगलादेशविरूद्ध टेस्ट सामना खेळत आहेत. या दोन सामन्यात टीम इंडियाने1-0 ने आघाडी घेतलीय. आता दुसऱ्या सामन्याची क्रिकेट फॅन्सना उत्सुकता असतानाच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने सेट्रेल कॉन्ट्रॅक्ट (BCCI Central Contracts) जाहीर केले आहे. या कॉन्ट्रॅक्टमध्ये अनेक खेळाडूंना बढती मिळाली आहे.
टीम इंडियाचा ऑलराऊंडर खेळाडू हार्दिक पंड्याला (Hardik Pandya) बीसीसीआयने बढती दिली आहे. बीसीसीआयने C श्रेणीवरून सरळ A श्रेणीत बढती दिली आहे. साल 2023 साठी त्याला बढती देण्यात आली आहे. टीम इंडियाच्या T20 संघाचे कर्णधारपद पंड्याकडे सोपवण्यात आले आहे होते. तसेच त्याने यावर्षी आपल्या कामगिरीने सर्वांना प्रभावित केले आहे. त्यामुळे त्याला ही बढली मिळाली आहे.
बीसीसीआयने (BCCI) हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya) ग्रेडमध्ये वाढ केली आहे. बीसीसीआयने त्याचा थेट सी ते ए ग्रेडमध्ये केंद्रीय करारात समावेश केला आहे. पंड्याला केंद्रीय करार 2022 मध्ये सी ग्रेडमध्ये स्थान देण्यात आले. त्यामुळे त्याला डिमोट करण्यात आले होते. पण 2023 च्या करारात त्यांचा पुन्हा ए ग्रेडमध्ये समावेश करण्यात आला आहे.
विशेष बाब म्हणजे हार्दिकची (Hardik Pandya) अवघ्या एका वर्षात बढती झाली आहे. हार्दिकसोबत इतरही अनेक खेळाडूंना बढती मिळणार आहे. मात्र, याबाबतचे अधिकृत वक्तव्य अद्याप समोर आलेले नाही.
न्यूझीलंड दौऱ्यासाठी हार्दिकला (Hardik Pandya) भारताच्या टी-20 संघाचा कर्णधार बनवण्यात आले होते. टीम इंडियाने ही तीन सामन्यांची मालिका 1-0 अशी जिंकली. या मालिकेतील पहिला सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. यानंतर भारताने दुसरा सामना 65 धावांनी जिंकला आणि तिसरा सामना बरोबरीत सुटला होता.
दरम्यान अद्याप बीसीसीआयचे सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट (BCCI Central Contract) अधिकृतरीत्यासमोर आले नाही आहे. हे समोर आल्यावर कळणार आहे, कोणत्या खेळाडूला कोणत्या श्रेणीत स्थान देण्यात आले आहे.