भारताच्या पुरुष आणि महिला खेळाडूंच्या मानधनात मोठी तफावत

बीसीसीआयने टीम इंडियाच्या खेळाडूंच्या वार्षिक कराराची घोषणा केली आहे.

Updated: Jan 17, 2020, 01:03 PM IST
भारताच्या पुरुष आणि महिला खेळाडूंच्या मानधनात मोठी तफावत title=

मुंबई : बीसीसीआयने टीम इंडियाच्या खेळाडूंच्या वार्षिक कराराची घोषणा केली आहे. यामध्ये पुरुष आणि महिला खेळाडूंचाही समावेश आहे. पण बीसीसीआयकडून पुरुष आणि महिला खेळाडूंच्या मानधनात दुजाभाव करण्यात आला आहे. पुरुष आणि महिला खेळाडूंच्या मानधनात मोठी तफावत पाहायला मिळत आहे.

पुरुष खेळाडूंमध्ये बीसीसीआयने ए+ ग्रेड, ए ग्रेड, बी ग्रेड आणि सी ग्रेड अशी विभागणी करण्यात आली आहे. तर महिला खेळाडूंमध्ये ए ग्रेड, बी ग्रेड आणि सी ग्रेड अशा तीनच ग्रेड ठेवण्यात आल्या आहेत. बीसीसीआयने २७ पुरुष खेळाडू आणि २२ महिला खेळाडूंसोबत करार केला आहे.

पुरुष खेळाडूंमध्ये ए+ ग्रेड असलेल्यांना ७ कोटी रुपये, ए ग्रेडच्या खेळाडूंना ५ कोटी रुपये, बी ग्रेडच्या खेळाडूंना ३ कोटी रुपये आणि सी ग्रेडच्या खेळाडूंना १ कोटी रुपये देण्यात येणार आहेत. दुसरीकडे महिला खेळाडूंमध्ये ए ग्रेडला ५० लाख, बी ग्रेडला ३० लाख आणि सी ग्रेडला १० लाख रुपये मिळणार आहेत.

पुरुष खेळाडूंची यादी

ए+ ग्रेड (७ कोटी रुपये)

विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह

ए ग्रेड (५ कोटी रुपये)

आर अश्विन, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, केएल राहुल, शिखर धवन, मोहम्मद शमी, इशांत शर्मा, कुलदीप यादव, ऋषभ पंत

बी ग्रेड (३ कोटी रुपये)

ऋद्धीमान सहा, उमेश यादव, युझवेंद्र चहल, हार्दिक पांड्या, मयंक अग्रवाल

सी ग्रेड (१ कोटी रुपये)

केदार जाधव, नवदीप सैनी, दीपक चहर, मनिष पांडे, हनुमा विहारी, शार्दुल ठाकूर, श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर

महिला खेळाडूंची यादी

ए ग्रेड (५० लाख रुपये)

हरमनप्रीत कौर, स्मृती मंधना, पूनम यादव

बी ग्रेड (३० लाख रुपये)

मिताली राज, झुलन गोस्वामी, एकता बिष्ट, राधा यादव, शिखा पांडे, दीप्ती शर्मा, जेमीमाह रोड्रिग्ज, तानिया भाटीया

सी ग्रेड (१० लाख रुपये)

वेदा कृष्णमूर्ती, पूनम राऊत, अनुजा पाटील, मानसी जोशी, डी हेमलता, अरुंधती रेड्डी, राजेश्वरी गायकवाड, पूजा वस्त्राकर, हरलीन देओल, प्रिया पुनिया, शेफाली वर्मा