बॅट्समनला शतकापासून रोखण्यासाठी बॉलरचं लज्जास्पद वर्तन

क्रिकेट हा जंटलमन्स गेम असल्याचं नेहमी बोललं जातं. 

Updated: Aug 9, 2018, 09:00 PM IST
बॅट्समनला शतकापासून रोखण्यासाठी बॉलरचं लज्जास्पद वर्तन title=

लंडन : क्रिकेट हा जंटलमन्स गेम असल्याचं नेहमी बोललं जातं. पण याच जंटलमन्स गेमला काळिमा फासणारी घटना क्रिकेटमध्ये घडली आहे. इंग्लंडमधल्या एका लीग मॅचमध्ये बॅट्समनला शतकापासून रोखण्यासाठी बॉलरनं जाणूनबुजून नो बॉल टाकला. समरसेट क्रिकेट लीगची ही मॅच होती. माइन हेड क्रिकेट क्लब आणि परनेल क्रिकेट क्लबमध्ये ही मॅच सुरु होती. माइन हेड क्रिकेट क्लबला विजयासाठी ५ रनची आवश्यकता होती. माइन हेड क्रिकेट क्लबचा जे डॅरेल हा खेळाडू ९५ रनवर खेळत होता. पण बॉलरनं डॅरेलच्या डोक्यावरून थेट बाऊंड्रीवर बॉल फेकला. यामुळे जे डॅरेलला त्याचं शतक पूर्ण करता आलं नाही.

या बॉलरच्या अखिलाडू वृत्तीवर इंग्लंडच्या वर्तमानपत्रांमध्ये आणि इंग्लंडच्या माजी क्रिकेटपटूंकडून जोरदार टीका होत आहे. याआधी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही असाच प्रकार घडला होता. श्रीलंकेचा बॉलर सुरज रणदीव यानं भारतीय क्रिकेटपटू विरेंद्र सेहवागला अशाच प्रकारे शतकापासून रोखलं होतं.