बांगलादेशच्या चाहत्यांचा 'हा' व्हिडिओ होतोय व्हायरल

कोलंबोला झालेला बांगलादेश विरूद्ध भारत हा सामना चांगलाच रंगला. 

Dakshata Thasale Updated: Mar 20, 2018, 12:49 PM IST
बांगलादेशच्या चाहत्यांचा 'हा' व्हिडिओ होतोय व्हायरल  title=

मुंबई : कोलंबोला झालेला बांगलादेश विरूद्ध भारत हा सामना चांगलाच रंगला. 

निदहास ट्रॉफी स्पर्धेतील बांगलादेशविरुद्धच्या अखेरच्या सामन्यात दिनेश कार्तिकने लगावलेल्या षटकाराच्या जोरावर भारताने चार विकेट राखून विजय मिळवला आणि जेतेपद उंचावले. या सामन्यानंतर अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. 

यामध्ये बांगलादेशच्या चाहत्यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये बांगलादेशचे चाहते नागिन डान्स करण्याच्या पूर्ण तयारीत आले होते. मात्र दिनेश कार्तिकने कशा पद्धतीने त्यांचा हिरमोड केला याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

भारत आणि बांग्लादेश यांच्या काल झालेल्या निडास ट्रॉफीच्या अंतीम सामन्यात एक वेगळचं चित्र दिसले. दिनेश कार्तिक या सामन्याचा हिरो ठरला पण आणखी एक चित्र दिसलं की ते अद्भूत होते. यात स्टेडिअममध्ये बसलेल्या प्रेक्षकांचा समावेश आहे. या संपूर्ण सामन्यात स्टेडिअममध्ये बसलेल्या श्रीलंकेच्या फॅन्सने भारताला पाठिंबा दिला.  भारताच्या प्रत्येक विकेटवर आणि प्रत्येक फटक्यावर श्रीलंकन फॅन्स खूप चिअर करत होते.