फॅन्ससोबत गैरवर्तन करणाऱ्या क्रिकेटरवर ६ महिन्यांची बंदी

 त्याने सोशल मीडियावर फॅन्सना शिविगाळ केल्याचे समोर आलं.

Updated: Sep 2, 2018, 09:11 AM IST
फॅन्ससोबत गैरवर्तन करणाऱ्या क्रिकेटरवर ६ महिन्यांची बंदी title=

ढाका : बॉलीवूड कलाका, क्रिकेटर्स असे सर्वच सेलिब्रिटी सध्या सोशल मीडियावर जास्त अॅक्टीव्ह असतात. त्यांचे फॉलोअर्स सोशल मीडियावर प्रेम अथवा राग व्यक्त करतात. याचा सेलिब्रेटींना फायदा तर कधी मनस्तापही होतो.फॅन्सला शिविगाळ  बांगलादेश क्रिकेट बोर्ड (बीसीबी) ने अभद्र भाषेचा वापर केल्याप्रकरणी बॅट्समन सब्बीर रेहमानवर ६ महिन्याची बंदी घातली आहे. त्याने सोशल मीडियावर फॅन्सना शिविगाळ केल्याचे समोर आले होते. त्यामुळे आता पुढील सहा महिने तो घरगुती किंवा आंतरराष्ट्रीय सामने खेळू शकत नाही. सब्बीर आणि मोसादिक हुसैन याप्रकरणी सुनावणीसाठी बोर्ड समितीसमोर आले. समितीने हुसैनवर आपला निर्णय सांगितला नाही. 

 सब्बीर विरोधात याआधीहीअनेक तक्रारी आल्या होत्या. बोर्डाने यासंबंधी त्याला समजही दिली होती.२६ वर्षाच्या सब्बीरने बांगलादेशसाठी ११ टेस्ट, ५४ वनडे आणि ४१ टी २० चे आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. 

हुंड्यासाठी त्रास 

बांगलादेशचा आणखी एक क्रिकेटर मोसादेक हुसैनदेखील गंभीर प्रकरणात फसत असल्याचे दिसत आहे. हुसैनवर हुंडा घेतल्याचा आरोप त्याच्या पत्नीने केला होता. पत्नी शरमीन समीरा उषाने स्थानिक पोलिसात हुसैनविरूद्ध तक्रार दिली होती. हुंड्यासाठी माझा छळ करत असल्याचे तिने तक्रारीत म्हटल्याचे बांगलादेशी माध्यमांमध्ये म्हटलं गेलंय.