'पाकिस्तानी क्रिकेट ICU मध्ये',आयत्यावेळी बाबर आझमचा कर्णधारपदाचा राजीनामा!

White-Ball Captaincy: अलीकडेच बाबर आझमने पाकिस्तान क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. बाबरने संघाचे कर्णधारपद सोडण्याची ही दुसरी वेळ आहे.

Updated: Oct 3, 2024, 02:28 PM IST
'पाकिस्तानी क्रिकेट ICU मध्ये',आयत्यावेळी बाबर आझमचा कर्णधारपदाचा राजीनामा!  title=
Photo Credit: AP/PTI

Babar Azam Resigns: पाकिस्तान क्रिकेट संघाचा त्रास संपायचा काही नाव घेत नाही. संघ सध्या सर्वात वाईट टप्प्यातून जात आहे. कर्णधारही आता पाकिस्तान संघाला सोडचिठ्ठी देत ​​आहे. कमकुवत संघांकडून पराभूत झाल्यानंतर बाबर आझमने व्हाईट बॉलच्या कर्णधारपदाचा राजीनामा जाहीर केला आहे. यामुळे पाकिस्तान क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. कर्णधारपद सोडण्यामागचे कारणही बाबरने स्पष्ट केले आहे. त्याला आता त्याच संपूर्ण लक्ष फलंदाजीवर केंद्रित करायचे आहे, यामुळे तो कर्णधारपद सोडत आहे. बाबरच्या निर्णयानंतर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू राशिद लतीफ यांनी त्याला चांगलंच सुनावलं आहे. बाबर आझमच्या कर्णधारपद सोडण्याच्या वेळेवरही त्यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

पाकिस्तानी क्रिकेट टीम संकटात

बाबरचा राजीनाम्याची वेळ अतिशय चुकीची आहे. जेव्हा पाकिस्तान संघ इंग्लंडविरुद्ध 3 सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी तयारी करत आहे तेव्हा हा राजीनामा आला आहे. या कसोटी मालिकेतील पहिला सामना हा मुलतानमध्ये ७ ऑक्टोबरपासून खेळवला जाणार आहे. रशीद लतीफ यांनी एएफपीशी बोलताना सांगितले की, " पाकिस्तान संघात नेतृत्वाचे संकट आहे. पाकिस्तान क्रिकेट आयसीयूमध्ये असून उपचारासाठी कोणीही तज्ज्ञ नाहीये. बाबरने पुन्हा कर्णधारपद स्वीकारायला नको होते. ना संघ चांगली कामगिरी करत होता ना बाबर मोठ्या धावा करत होता. हा राजीनामा खूप उशिरा आला असून त्यामुळे त्यांचे स्वतःचेच नव्हे तर संघाचेही मोठे नुकसान झाले आहे." 

 

संघ नवीन कर्णधाराच्या शोधात 

सततच्या खराब कामगिरीमुळे पाकिस्तान क्रिकेट सगळ्याकग बाजूने टीकेला सामोरे जावे लागत आहे.यावेळी फक्त फॅन्सच नाही तर पाकिस्तानी माजी क्रिकेटपटूही संघाच्या खेळाडूंवर टीका करत आहेत. गेल्या काही वर्षांपासून पाकिस्तान क्रिकेट आयसीसी इव्हेंट्स तसेच द्विपक्षीय सीरीजमध्ये खराब कामगिरी करत आहे. याचा परिणाम असा झाला की, पाकिस्तान संघाला ग्रुप स्टेजच्या पुढेही जाता आले नाही. आता पुढील वर्षी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानच्या धर्तीवर होणार आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तान क्रिकेट बोर्डावर (PCB) मोठा दबाव आहे. आता मर्यादित षटकांच्या फॉरमॅटमध्ये बाबर आझमच्या जागी कर्णधारपद कोणाला मिळते हे पाहावे लागेल.