दिग्गज स्पिनर का करतोय कारपेंटरची कामं, जाणून घ्या कारण

क्रिकेटमधून निवृत्ती घेताच बॉल सोडून हाती आलं सुतारकामाचं मशीन, नेमकं काय घडलं?

Updated: Jun 1, 2021, 02:51 PM IST
दिग्गज स्पिनर का करतोय कारपेंटरची कामं, जाणून घ्या कारण title=

मुंबई: आंतरराष्ट्रीय क्रिकेट असो किंवा एकूणच क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर अनेक खेळाडू त्या खेळाशी निगडीत काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात. पण एका दिग्गज क्रिकेटपटून या सगळ्यापासून दूर जात कारपेंटरची काम करायला सुरुवात केली. ऑस्ट्रेलियाचे माजी स्पिनर झेव्हियर डोहर्टी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला निरोप दिला. त्यानंतर त्यांनी क्रिकेटपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. 

ऑस्ट्रेलियाच्या 2015 च्या वर्ल्ड कप टीमचे सदस्य असलेले झेव्हियर हे सध्या कारपेंटर म्हणून काम करत आहेत. ऑस्ट्रेलियाच्या या माजी स्पिनरचा व्हिडीओ सोशल मीडियावर देखील व्हायरल होत आहे. 

झेव्हियर म्हणतात की, "आता मी सुतार कामातील सर्व गोष्टी जाणून घेत आहे. बांधकाम साइट्सवर माझा हा दिवस आहे आणि मी त्याचा खूप आनंद घेत आहे. बाहेर राहुन नवीन गोष्टी शिकण्याचा आनंद घेत आहे. क्रिकेटपेक्षा हे खूपच वेगळं आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.'

'जेव्हा मी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली तेव्हा पुढे काय करायचा याचा मी विचार केला नव्हता. अशाच परिस्थितीमध्ये 12 महिने उलटले. त्यानंतर आपण सुतारकाम करावे असं त्यांना वाटलं आणि सध्या या क्षेत्रातील सर्व बारकावे शिकत आहेत.'

झेव्हियर डोहर्टी यांनी मेलबर्नमध्ये श्रीलंके विरुद्धच्या आंतरराष्ट्रीय वन डे सामन्यातून क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. डोहर्टी यांनी 4 कसोटी सामन्यांमध्ये 7 विकेट्स घेतल्या. तर 60 वन डे सामन्यात 55 विकेट्स घेतल्या आहेत. टी 20चा विचार करायचा तर 11 सामने खेळले असून 10 विकेट्स घेतल्या आहेत. तर बॅटिंगमध्ये टेस्टमध्ये 4 सामने खेळून 51 धावा केल्या तर वन डेमध्ये 60 सामने खेळून 101 धावा केल्या आहेत.