मुंबई: IPLमधील कॅच घेतानाचे अनेक अविस्मरणीय क्षण नुकतेच पाहिले पण मैदानावर सामन्या दरम्यान आऊट करण्यासाठी फील्डची खटाटोप सुरू असते. गेल्या काही दिवसात फेक फिल्डिंगच्या व्हिडीओवरून झालेला वाद असतो किंवा रन आऊट वरून होणारा वाद गेल्या काही दिवसात याचे अनेक व्हिडीओ आपल्या समोर आले आहेत. आता IPLआधी एका जबरदस्त कॅचची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. यामध्ये फील्डर आऊट करण्यासाठी जीवापाड प्रयत्न करतो मात्र थोड्या फरकानं राहून जातं.
ऑस्ट्रेलियाचा युवा ऑलराउंडर खेळाडू कॅमरन ग्रीन याने फील्डिंग दरम्यान 21 व्या ओव्हरवेळी षटकार जाणारा चेंडू पकडण्याचा प्रयत्न केला. त्याला यश मिळालं असं वाटणार तोच त्याच्या हातातून चेंडू सुटला आणि खाली पडला.
Cameron Green has almost pulled off the single greatest catch in cricket history!
Almost... #MarshCup pic.twitter.com/fkR9QxOt30
— cricket.com.au (@cricketcomau) April 8, 2021
ग्रीननं बाऊंड्रीजवळ पकडलेल्या या तुफान कॅचची मात्र सगळीकडेच चर्चा होत आहे. वाऱ्याच्या वेगानं धावत जाऊन त्यानं कॅच पकडला खरा मात्र तो सुटला आणि घोळ झाला. त्याच्या या कॅचची चर्चा सर्वत्र होत आहे.
हा कॅच यशस्वी झाला असता तर जगातला सर्वात अप्रतीम कॅच समजला गेला असता अशी चर्चाही सुरू आहे. ऑस्ट्रेलियामध्ये सध्य़ा फिफ्टी 20 टुर्नामेंट मार्श कप सुरू आहे. त्यावेळी सामन्यादरम्यान झालेला हा प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाला आणि सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.