AUS vs SL: ...अन् भर मैदानात मॅक्सवेल कोसळला, पाहा त्या ओव्हरवेळी नेमकं काय घडलं?

Australia vs Sri Lanka : श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील सामन्यात लाहिरू कुमाराच्या एक बॉलवर ग्लेन मॅक्सवेलला जमिनीवर कोसळला. 

Updated: Oct 25, 2022, 11:51 PM IST
AUS vs SL: ...अन् भर मैदानात मॅक्सवेल कोसळला, पाहा त्या ओव्हरवेळी नेमकं काय घडलं? title=

AUS vs SL, Glenn Maxwell : T20 विश्वचषक 2022 च्या 19 व्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेचा 7 गडी राखून पराभव करत स्पर्धेत पुनरागमन केलंय. श्रीलंकेने ऑस्ट्रेलियासमोर (AUS vs SL) विजयासाठी 158 धावांचे लक्ष्य ठेवलं होतं, ते कांगारू संघाने 16.3 षटकांत सहज पुर्ण केलं. ऑस्ट्रेलियासाठी या सामन्याचे हिरो मार्कस स्टॉइनिस (Marcus Stoinis) आणि ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) होते, ज्यांनी कासवाच्या वेगाने धावणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या डावाला गती दिली आणि सामना पारड्यात टाकला.

स्टॉइनिस शेवटपर्यंत नाबाद राहिला आणि त्याने 18 चेंडूत 59 धावांची तुफानी खेळी खेळली. स्टॉइनिसच्या या झंझावातापूर्वी मॅक्सवेलनेही काही शानदार शॉट्स खेचले. मॅक्सवेलने 12 चेंडूत 23 धावा केल्या मात्र यादरम्यान तो लाहिरू कुमाराच्या (Lahiru Kumara) एका बॉलवर जखमी झाला. लाहिरूच्या वेगापुढे मॅक्सवेल पूर्णपणे असहाय्य दिसत होता. झालं असं की...

आणखी वाचा - क्रिकेटप्रेमींसाठी वाईट बातमी, T20 World Cup मध्ये कोरोनाची एन्ट्री

ही घटना 12 व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर घडली जेव्हा कुमाराचा वेगवान बाउन्सर स्टोइनिसच्या (Marcus Stoinis) थेट मानेवर आदळला आणि तो बॅट-हेल्मेट सोडून जमिनीवर बसला. मॅक्सवेलला वेदना होत असल्याचं पाहून बाकीचे खेळाडू त्याच्याकडं धावत गेले आणि फिजिओलाही तातडीने बोलावण्यात आलं. चांगली गोष्ट म्हणजे यानंतरही मॅक्सवेलने फलंदाजी केली, त्याला जास्त गंभीर दुखापत झाली नाही.

पाहा व्हिडीओ- 

दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. एकेकाळी सामन्यात श्रीलंकेचा दबदबा दिसत होता. मात्र, मॅक्सवेल आणि स्टॉयनिसच्या खेळीने संपूर्ण सामना फिरवला. या विजयासह ऑस्ट्रेलियाने स्पर्धेत दणक्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे आगामी सामन्यात ऑस्ट्रेलियन संघ कशी कामगिरी करणार हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे.