Pakistan Team : भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वीच पाक टीमला मोठा झटका; पाहा नेमकं काय घडलंय...

Pakistan Team : आज दुपारी भारत विरूद्ध पाकिस्तान ( India vs Pakistan ) यांच्यात कोलंबोच्या प्रेमदासा मैदानावर सामना रंगणार आहे. मात्र या सामन्यापूर्वीच पाकिस्तानच्या टीमला मोठा झटका बसलाय. 

सुरभि जगदीश | Updated: Sep 10, 2023, 01:11 PM IST
Pakistan Team : भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वीच पाक टीमला मोठा झटका; पाहा नेमकं काय घडलंय... title=

Pakistan Team : आज दुपारी भारत विरूद्ध पाकिस्तान ( India vs Pakistan ) यांच्यात कोलंबोच्या प्रेमदासा मैदानावर सामना रंगणार आहे. मात्र या सामन्यापूर्वीच पाकिस्तानच्या टीमला मोठा झटका बसलाय. आयसीसी वनडे रँकिंगमधील पाकिस्तान टीमची बादशाहत हिरावून घेण्यात आलीये. आयसीसी वनडे रँकिंगमध्ये ( ICC ODI RANKINGS ) ऑस्ट्रेलियाने बाजी मारत पाकिस्तानचा नंबर 1 चा ताज हिसकावलाय. यामुळे पाकिस्तानला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावं लागतंय.

दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वनडे सिरीज खेळवली जातेय. 4 सामन्यांची ही सिरीज असून तिसरा सामना 9 सप्टेंबर रोजी खेळवला गेला. ऑस्ट्रेलियाने यजमान दक्षिण आफ्रिकेचा यावेळी मोठ्या फरकाने पराभव केला. या विजयानंतर पाकिस्तानचं मोठं नुकसान झालं. ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा 123 रन्सने पराभव करून आयसीसी वनडे क्रमवारीत ( ICC ODI RANKINGS ) मोठा बदल केलाय. पाकिस्तानचा धुव्वा उडवत त्याने वनडे क्रमवारीत अव्वल स्थान पटकावलंय

ICC ODI RANKINGS मध्ये नंबर 1 बनली ऑस्ट्रेलिया

9 सप्टेंबर रोजी खेळल्या गेलेल्या तिसर्‍या सामन्यात ऑस्ट्रेलियाने उत्तम कामगिरी करत दक्षिण आफ्रिकेला पराभूत केलं. यावेळी पाकिस्तानला खाली खेचत ICC वनडे क्रमवारीत ऑस्ट्रेलिया नंबर 1 बनली आहे. याआधी पाकिस्तानची टीम नंबर 1 होती. 10 दिवसांपूर्वीच पाकने नंबर 1 चे विजेतेपद पटकावलं होतं. पाकिस्तान आता ऑस्ट्रेलियापेक्षा केवळ 1 पॉईंटने मागे आहे. ऑस्ट्रेलियाचे 121 पॉईंट्स आहेत, तर पाकिस्तानचे 120 पॉईंट्स आहेत.

मात्र  पाकिस्तानला आयसीसी वनडे क्रमवारीत नंबर 1 बनण्याची आणखी एक संधी आहे. एशिया कप 2023 मध्ये भारत आणि पाकिस्तान सुपर 4 मध्ये भिडणार आहेत. या सामन्यात जर पाकिस्तानने भारताला हरवले तर ते पुन्हा पहिल्या क्रमांकाचे विजेतेपद पटकावू शकणार आहेत. मात्र या सामन्यात टीम इंडियाचं पारडं जड मानलं जातंय. आयसीसी वनडे क्रमवारीत भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. टीम इंडियाने 114 पॉईंट्स आहेत.