मुंबई : बीसीसीआयने (BCCI) आयपीएलच्या 14 व्या मोसमातील (IPL 2021) उर्वरित 31 सामन्यांचे आयोजन यूएईमध्ये (UAE) करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यंमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रकोपामुळे 4 मे ला बीसीसीआयने 29 सामन्यांच्या यशस्वी आयोजनानंतर 14 वं पर्व अनिश्चितकाळासाठी स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, उर्वरित सामने सुरु होण्याआधी मोठी बातमी समोर येत आहे. (Australia and England 30 players will not have in the remaining 31 matches of the 14th season of the IPL)
आयपीएलमध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडचे खेळाडू मोठ्या प्रमाणात सहभागी होतात. यामुळे सामन्यांमध्ये आणखी रंगत येते. पण, आता या दोन्ही संघांचे एकूण 30 खेळाडू हे उर्वरित 31 सामन्यांमध्ये सहभागी होणार नाहीयेत. यामध्ये कांगारुंच्या 18 आणि 12 इंग्लिश खेळाडूंचा सहभाग आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (ECB) याबाबत आधीच स्पष्ट संकेत दिले होते. इंग्लंडच्या खेळाडूंना आयपीएलच्या दरम्यान इतर काही मालिका खेळायच्या आहेत. त्यामुळे इंग्लंडच्या खेळाडूंना आयपीएलमध्ये सहभाग घेता येणार नाही.
सोबतच ऑस्ट्रेलियाचे खेळाडूही पुढील काही महिन्यांमध्ये काही सीरिज खेळणार आहेत. ऑस्ट्रेलियाला आगामी टी 20 वर्ल्ड कपच्या आधी 3-4 सीरिज खेळायच्या आहेत. ऑस्ट्रेलिया बांगलादेश विरुद्ध 5 सामन्यांची टी 20 मालिका खेळणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खेळाडूंना बायो बबलमध्ये रहावे लागते. या दरम्यान खेळा़डूंना नियमांचं काटेकोरपणे पालन करावं लागतं. या नियमांमुळे ऑस्ट्रेलियाचे खेळाडूही सहभागी होऊ शकणार नाहीत.