T20 World Cup : के एल राहूलचा 'तो' फोटो पाहून फॅन्स भडकले, 'हे' आहे कारण

टी20 वर्ल्ड कप हरला,पण तिच मन जिंकल! राहूलचा अथिया शेट्टीसोबतचा फोटो होतोय व्हायरल

Updated: Nov 11, 2022, 07:21 PM IST
 T20 World Cup : के एल राहूलचा 'तो' फोटो पाहून फॅन्स भडकले, 'हे' आहे कारण title=

पर्थ : ऑस्ट्रेलियात सुरु असलेल्या टी20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) दुसऱ्या सेमी फायनल सामन्यात टीम इंडियाचा (Team India) इंग्लंडने 4 ओव्हर्स आणि 10 विकेट राखून पराभव केला. या पराभवानंतर आता एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. या व्हायरल फोटोवरून टीम इंडियाच्या खेळाडूंवर टीका होऊ लागली आहे. 

हे ही वाचा : T20 World Cup मधील पराभवानंतर मोठा फेरबदल! टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी VVS Laxman

फोटो व्हायरल

सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी (Athiya Shetty) तिचा प्रियकर टीम इंडियाचा ओपनर के एल राहूलसोबत (Kl Rahul) ऑस्ट्रेलियात पोहोचली होती. यावेळी वर्ल्ड कप दरम्यान दोघांचे एकत्र वेळ घालवतानाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तसेच स्टेडिअममध्ये राहूलला (Kl Rahul) सपोर्ट करतानाचे तिचे अनेक फोटो देखील समोर आले होते. आता असाच एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोवर टीका होऊ लागली आहे. 

फोटोत काय?

विराटच्या एका फॅन पेजने भारतीय क्रिकेट संघ अॅडलेडमधील एका रेस्टॉरंटमध्ये जेवण करतानाचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये केएल राहुल (Kl Rahul) आणि अथिया शेट्टी (Athiya Shetty) एकमेकांच्या शेजारी बसलेले दिसत आहेत. दोघे एकमेकांच्या डोळ्यात पाहुन बोलत आहेत. दोघांची लव्ह केमेस्ट्री येथे दिसून येतेय. तर टीमच्या इतर सदस्यांसह राहुल द्रविड त्यांच्यासोबत टेबलावर बसलेले दिसत आहेत. 

फॅन्स संतापले

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा फोटो गुरूवारी रात्रीचा असल्याचे बोलले जात आहे. याच दिवशी टीम इंडियाचा (Team India) न्युझीलंडने 10 विकेट राखून सेमी फायनलमध्ये पराभव केला होता. तसेच टीम इंडियाच्या पराभवाला फॅन्सनी राहूललाही जबाबदार ठरवले होते. कारण सेमी फायनल सामन्यात तो मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला होता. त्यामुळे टीम इंडियाच्या वर्ल्ड कपमधील पराभवानंतर हा फोटो व्हायरल झाल्याने फॅन्स चांगलेच भडकले आहेत.  

दरम्यान अथिया शेट्टी (Athiya Shetty) आणि के एल राहूल (Kl Rahul) अफेअरच्या खुप चर्चा आहेत. दोघेही लग्न बंधनात अडकणार असल्याचे बोलले जात आहे. सुत्रानुसार पुढच्या वर्षी जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये ते लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचीही चर्चा आहे.