एशिया कप स्पर्धेत Virat Kohli इतिहास रचणार, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकराचा महाविक्रम मोडणार

एशिया कप स्पर्धेला सुरुवात झाली आहे. पण करोडो क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलं आहे ते कट्टार प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान सामन्याकडे. भारताच्या मिशन एशिया कपला 2 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. टीम इंडियाच्या कामगिरीबरोबरच क्रिकेट प्रेमींचं विराट कोहलीच्या कामगिरीवर लक्ष असणार आहे. 

राजीव कासले | Updated: Aug 30, 2023, 05:51 PM IST
एशिया कप स्पर्धेत Virat Kohli इतिहास रचणार, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकराचा महाविक्रम मोडणार title=

Virat Kohli, Fastest to Reach 13000 ODI Runs : एशिया कप स्पर्धेसाठी टीम इंडिया (Team India) श्रीलंकेत दाखल झाली आहे. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट संघाचा पहिला सामना 2 सप्टेंबरला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी (India vs Pakistan) होणार आहे. गत एशिया कप स्पर्धेत भारताला अंतिम सामन्यापूर्वीच गाशा गुंडाळावा लागला होता. पण यावेळी रोहितसेना दमदार कामगिरी करेल असा विश्वास भारतीय क्रिकेट चाहत्यांना आहे. टीम इंडियाचे सर्व सामने श्रीलंकेत होणार असून क्रिकेट चाहत्यांचं टीम इंडियाच्या कामगिरीवर लक्ष लागलं आहे. पण त्याचबरोबर भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीच्या (Virat Kohli) कामगिरीवरही सर्वांचं लक्ष असेल आणि याला कारणही तसंच आहे. 

विराट कोहली रचणार इतिहास
भारताचा माजी कर्णधार आणि हुकमी फलंदाज विराट कोहली एशिया कप 2023 स्पर्धेत पाकिस्तानविरुद्ध फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरले. यावेळी त्याच्याकडे इतिहास रचण्याची संधी असेल. विराट कोहली मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा महाविक्रम मोडणार का याकडेच क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं असेल. आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये वेगवान 13000 हजार धावा करणारा फलंदाज ठरू शकणार आहे. 

सचिन तेंडुलकर टॉपवर
विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये 275 सामन्यात तब्बल 12898 धावा केल्या आहेत. यात त्याने 40 वेळा नाबाद खेळी केली आहे. तर 46 शतकं त्याच्या नावावर जमा आहेत. आता 2 सप्टेंबरला एशिया कप स्पर्धेत विराटने 102 धावा केल्यास तर तो सचिन तेंडुलकरच्या एक पाऊल पुढे जाणार आहे. सचिन तेंडुलकरच्या नावावर एकदिवसीय क्रिकेटमध्ये वेगवान 13000 धावा करण्याचा विक्रम आहे. 

विराटला मोठी संधी
विराटने एकदिवीस क्रिकेटमध्ये 265 इनिंगमध्ये 12898 धावा केल्या आहेत. तर सचिन तेंडुलकरला 13 हजार धावा करण्यासाठी 321 इनिंग खेळाव्या लागल्या. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉण्टिंगने 341 इनिंगमध्ये 13 हजार धावांचा टप्पा पार केला होता. श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकाराने 363 इनिंगमध्ये 13 हजार धावा पूर्ण केल्या होत्या. या सर्वांपेक्षा विराट कोहलीला अगदी कमी इनिंगमध्ये हा विक्रम करण्याची संधी आहे. 

एशिया कपसाठी भारतीय संघ 
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, इशान किशन, विराट कोहली,  केएल राहुल, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल , कुलदीप यादव , जसप्रीत बुमराह , मोहम्मद. शमी, मोहम्मद. सिराज, प्रसिद्ध कृष्णा