Asia cup 2023 : एशिया कपचं वेळापत्रक अखेर जाहीर; 'या' तारखेला भारत-पाक भिडणार

Asia cup 2023 : आशिया कपच्या शेड्यूलची घोषणा अखेर करण्यात आली आहे. क्रिकेट चाहते ज्या सामन्याची आतुरतेने वाट पाहत होते, त्या भारत-पाकिस्तान सामन्याची तारीख समोर आली आहे. 

सुरभि जगदीश | Updated: Jul 19, 2023, 07:38 PM IST
Asia cup 2023 : एशिया कपचं वेळापत्रक अखेर जाहीर; 'या' तारखेला भारत-पाक भिडणार title=

Asia cup 2023 : क्रिकेट चाहत्यांसाठी खूप आनंदाची बातमी आहे. आशिया कपच्या शेड्यूलची घोषणा अखेर करण्यात आली आहे. 30 ऑगस्टपासून एशिया कपला सुरुवात होणार आहे. तर याचा फायनल सामना 17 सप्टेंबर रोजी कोलंबोमध्ये खेळवला जाणार आहे. पाकिस्तानद्वारे याचं आयोजन केलं जातंय. सर्वांचं लक्ष या सिरीजमधील भारत-पाकिस्तान सामन्यावर असणार आहे. भारत-पाकिस्तानचा हायव्होल्टेज सामना 2 सप्टेंबर रोजी खेळवला जाईल.

'या' मैदानावर रंगणार भारत पाकिस्तान सामना

आशिया कपमध्ये पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तान टीम्स आमने-सामने येणार आहेत. 2 सप्टेंबरला हा हायव्हेल्टेज सामना रंगणार आहे. श्रीलंकेच्या कॅंडली मैदानावर हा सामना खेळवण्यात येणार असून चाहत्यांची गर्दी पुन्हा एकदा पहायला मिळणार आहे. याशिवाय जर दोन्ही टीम्स सुपर-4 साठी पात्र ठरल्या तर भारत आणि पाकिस्तान टीम पुन्हा एकदा म्हणजेच 10 सप्टेंबरला आमनेसामने येऊ शकतात.

हायब्रिड मॉडलवर खेळवला जाणार आशिया कप

यंदाच्या आशिया कपसाठी केवळ पाकिस्तान ( Pakistan ) या स्पर्धेचे यजमानपद भूषवणार नाही. ही स्पर्धा दोन वेगवेगळ्या देशांमध्ये खेळवली जाणार आहे. पाकिस्तानसोबत श्रीलंकेमध्येही सामने खेळवण्यात येणार आहेत. यावेळी 5 सामने पाकिस्तानात तर उर्वरित सामने श्रीलंकेच्या मैदानावर खेळवण्यात येणार आहेत.

आशिया कपचे संपूर्ण वेळापत्रक :

  • पाकिस्तान विरुद्ध नेपाळ - 30 ऑगस्ट
  • बांगलादेश विरुद्ध श्रीलंका - 31 ऑगस्ट
  • भारत विरुद्ध पाकिस्तान - 2 सप्टेंबर
  • बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान - 3 सप्टेंबर
  • भारत विरुद्ध नेपाळ - 4 सप्टेंबर
  • श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान - 5 सप्टेंबर

सुपर-4 चे सामने कसे होतील?

  • A1 वि B2 - 6 सप्टेंबर
  • B1 वि B2 - 9 सप्टेंबर
  • A1 वि A2 - 10 सप्टेंबर
  • A2 वि B1 - 12 सप्टेंबर
  • A1 वि B1 - 14 सप्टेंबर
  • A2 वि B2 - 15 सप्टेंबर
  • फायनल सामना - 17 सप्टेंबर