अखेर BCCI ने स्विकारलं PCB चं आमंत्रण; पाकिस्तानला जाणार क्रिकेट बोर्डाचे 'हे' 2 पदाधिकारी!

Roger Binny & Rajeev Shukla Travel to Pakistan : आगामी आशिया कप (Asia Cup 2023) सामन्यासाठी बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि उपाध्यक्ष राजीव शुक्ला पाकिस्तानला जाणार आहे. 

Updated: Aug 25, 2023, 11:29 PM IST
अखेर BCCI ने स्विकारलं PCB चं आमंत्रण; पाकिस्तानला जाणार क्रिकेट बोर्डाचे 'हे' 2 पदाधिकारी! title=
Roger Binny, Rajeev Shukla, jay shah,

BCCI Accepted PCB invitation : यंदाचा आशिया चषक (Asia cup 2023) कुठे खेळवला जाणार? यावरुन बीसीसीआय (BCCI) आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डादरम्यानचे (PCB) मतभेद उघडपणे समोर आले होते. भारतीय संघ पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळणार नाही, असं स्पष्ट मत मांडल्यानंतर आता आशिया कप स्पर्धा हायब्रीड मॉडेलवर खेळवली जाणार आहे. या मॉडेलप्रमाणे 4 सामने पाकिस्तानमध्ये तर 9 सामने श्रीलंकेत खेळवले जाणार आहेत. अशातच सलामीचा सामना पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात खेळवला जाणार आहे. त्याआधी उद्घाटन कार्यक्रम आयोजित केला जाईल. उद्घाटन कार्यक्रमासाठी आणि सामना पाहण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने  बीसीसीआयचे सचिव आणि आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शहा यांना उद्घाटन समारंभात सहभागी होण्याचं आमंत्रण पाठवलं होतं. मात्र, त्याऐवजी आता स्पर्धेचा उद्घाटनाचा सामना पाहण्यासाठी बीसीसीआय अध्यक्ष राजा दिल्ली व उपाध्यक्ष राजीव शुक्ला हे पाकिस्तानला जाणार आहेत.

राजीव शुक्ला आणि रॉजर बिन्नी 4 सप्टेंबरला वाघा बॉर्डरमार्गे पाकिस्तानात जाणार आहेत. आशिया चषकाचे सामने 5 आणि 6 ऑगस्ट रोजी लाहोरमध्ये होणार असल्याने या दोन्ही सामन्यांदरम्यान राजीव शुक्ला आणि रॉजर बिन्नी उपस्थित राहू शकतात, अशी माहिती सुत्रांच्या हवाल्यानुसार समोर आली आहे. लवकरच बीसीसीआय याची अधिकृत घोषणा करेल.

बीसीसीआय अध्यक्षांचा दौरा महत्त्वाचा का?

भारत आणि पाकिस्तान दरम्यानच्या राजकीय तणावपूर्ण परिस्थितीमुळे भारत आणि पाकिस्तानदरम्यान क्रिकेट मालिका खेळली गेलेली नाही. 2012 मध्ये भारत आणि पाकिस्तान सीरिज खेळवण्यात आली होती. तेव्हा पाकिस्तान क्रिकेट संघ भारत दौऱ्यावर आला होता. तर गेली चौदा वर्ष भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानचा दौरा केलेला नाही. 2008 मध्ये एशिया कप स्पर्धेसाठी भारतीय संघ पाकिस्तानात गेला होता. त्यामुळे द्वपक्षिय मालिकेसाठी बीसीसीआय अध्यक्षांचा दौरा महत्त्वाचा ठरू शकतो.