Asia Cup 2022 : टीम इंडियासाठी मोठी बातमी, आशिया कपच्या मुहूर्तावर बदलला कोच

राहूल द्रविड नाही तर आता आशिया कपसाठी हा दिग्गज असणार टीम इंडियाचा कोच

Updated: Aug 24, 2022, 08:35 PM IST
Asia Cup 2022 : टीम इंडियासाठी मोठी बातमी, आशिया कपच्या मुहूर्तावर बदलला कोच title=

मुंबई : आशिया कपच्या (Asia Cup 2022) मुहूर्तावर टीम इंडियाचा (Team India)  मुख्य कोच राहूल द्रविड (Rahul Dravid) कोरोना पॉझिटीव्ह आढळल्याने टीम इंडियाला मोठा धक्का बसता होता. त्यात आता राहूल द्रविडच्या कोरोनातून सावरण्याची सर्वांना प्रतिक्षा असताना आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. आशिया कपसाठी आता बीसीसीआयने (BCCI) कोच बदलला आहे. आशिया कपच्या मुहूर्तावर कोच बदलल्याने टीम इंडियाला हा दूहेरी धक्का मानला जात आहे.  

टीम इंडियाचा मुख्य कोच राहूल द्रविडला (Rahul Dravid) कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे वैद्यकिय टीमच्या देखरेखीखाली उपचार घेत असल्याची माहिती होती. तो लवकरात लवकर बरा होईल अशी अपेक्षा आहे. 

दरम्यान राहूल द्रविडला कोरोनाची (Rahul Dravid) लागण झाल्याने आता बीसीसीआयने मोठा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने आशिया कपसाठी अंतरिम प्रशिक्षकाच्या नावाची घोषणा केली आहे. भारतीय संघाशी समन्वय साधण्यासाठी, रणनीती आखण्यासाठी आता व्हीव्हीएस लक्ष्मण यांची आशिया कपसाठी अंतरिम प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.

निवेदनात काय?
बीसीसीआयने एका निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे (एनसीए) प्रमुख व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman) हे आगामी आशिया कपमध्ये (Asia Cup 2022)  भारताचे अंतरिम प्रशिक्षक असतील. 27 ऑगस्टपासून यूएईमध्ये ही स्पर्धा सुरू होणार आहे. लक्ष्मणने अलीकडेच झिम्बाब्वे दौऱ्यावर एकदिवसीय मालिका 3-0  ने जिंकणाऱ्या टीम इंडियाचे प्रशिक्षक म्हणूनही काम केले होते.तसेच बीसीसीआयच्या (BCCI)  वैद्यकीय पथकाने ग्रीन सिग्नल दिल्यानंतर द्रविड भारतीय संघात सामील होईल, असे निवेदनात म्हटले आहे.

दरम्यान येत्या रविवारी 28 ऑगस्ट रोजी भारताचा पहिला सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी होणार आहे. त्यामुळे या सामन्याची चाहत्यांना उत्सुकता लागलीय.