Asia Cup 2022 | क्रिकेट प्रेमींसाठी खूषखबर, 4 वर्षांनी आशिया कपचं आयोजन

आशियाई क्रिकेट परिषदेने (Asian Cricket Council) आज शनिवारी (19 मार्च) आशिया कप स्पर्धेच्या (Asia Cup 2022) वेळापत्रक जाहीर केलं आहे. 

Updated: Mar 19, 2022, 05:12 PM IST
Asia Cup 2022 | क्रिकेट प्रेमींसाठी खूषखबर, 4 वर्षांनी आशिया कपचं आयोजन title=
प्रातिनिधिक छायाचित्र

मुंबई :  आशियाई क्रिकेट परिषदेने (Asian Cricket Council) आज शनिवारी (19 मार्च) आशिया कप स्पर्धेच्या (Asia Cup 2022) वेळापत्रक जाहीर केलं आहे. आशिया कप स्पर्धेचं आयोजनाचा मान हा श्रीलंकेला मिळाला आहे. या आगमी आशिया कप स्पर्धेचं आयोजन हे  27 ऑग्स्ट ते 11 सप्टेंबर दरम्यान करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे ही स्पर्धा यंदा 20 ओव्हरची असणार आहे. तर बाद फेरीतील सामन्यांना 20 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. (asia cup 2022 t 20 format will organised in sri lanka in upcoming 27 august to 11 september) 

एसीसीने मात्र अजून सामनेनिहाय तारखा जाहीर केलेल्या नाहीत. या स्पर्धेतील 20 फॉर्मेटचं 2016 नंतर पहिल्यांदाच आयोजन करण्यात आलं आहे. आशिया कपचं अखेरीस 2018 मध्ये आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळेस टीम इंडियाने वनडे आशिया कप जिंकला होता. 

टीम इंडियाने आतापर्यंत एकूण 7 वेळा आशिया कप जिंकण्याची कामगिरी केली आहे. टीम इंडियाने 2016 आणि 2018 मध्ये सलग आशिया कप जिंकला होता.  त्यामुळे यावेळेस टीम इंडियाचं हॅट्रिकसह आठव्यांदा आशिया कप जिंकण्याचं मानस असणार आहे.

आशिया कप स्पर्धेचं दर 2 वर्षानं आयोजन केलं जातं. मात्र कोरोनामुळे 2020 मध्ये या स्पर्धेचं आयोजन रद्द करण्यात आलं. त्यामुळे 2 वर्षांनी पुन्हा या स्पर्धेचं आयोजनस करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.