यूएई : टीम इंडिया विरुद्ध पाकिस्तान (Ind vs Pak) म्हणजे हायव्होल्टेज सामना, थरार, भीती असं कम्पलिट पॅकेज. या सामन्याची संपूर्ण क्रिकेटविश्व आवर्जून वाट पाहतं. आशिया कप 2022 मधील (Asia Cup 2022) दुसऱ्याच सामन्यात हे दोन्ही संघ आमनेसामने आलेत. या सामन्यात टीम इंडियाचे माजी खेळाडू इरफान पठाण (Irfan Pathan) आणि गौतम गंभीर (Gautsm Gambhir) कॉमेंट्री करतायेत.
इरफानने गंभीरला कॉमेंट्रीदरम्यान पाकिस्तान विरुद्धच्या हमरीतुमरीबाबत प्रश्न विचारला. गंभीरने या प्रश्नानाचं शानदार पद्धतीने उत्तर दिलं. (asia cup 2022 ind vs pak former team india player gautam gambhir gived answer to irfan pathan question over to controversy against pakistani players)
"मैदानात पाकिस्तानच्या खेळाडूंविरुद्ध सर्वात जास्त वाद तुझे व्हायचे. मात्र सर्वात जास्त वाद हे टीव्हीवर माझे दाखवले गेलेत", असं गंमतशीर उत्तर गंभीरनं दिलं.
गौतम गंभीर आणि पाकिस्तानचा विकेटकीपर कामरन अकमल यांच्यात चांगलीच हमरीतुमरी झाली होती. हा सर्व प्रकार आशिया कप 2010 मध्ये घडला होता. या प्रकाराला उजाळा देत इरफानने गंभीरला चिमटा काढत वरील प्रश्न विचारला. तर गंभीरनेही तितकंच सफाईदारपणे उत्तर दिलं.
IND vs PAK, Asia Cup: टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, युजवेंद्र चहल, रवींद्र जडेजा, भुवनेश्वर कुमार, आवेश खान आणि अर्शदीप सिंह. पाकिस्तान प्लेइंग इलेव्हन : बाबर आझम (कॅप्टन), मोहम्मद रिझवान (विकेटकीपर), फखर जमां, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, आसिफ अली, शादाब खान, मोहम्मद नवाज, नसीम शाह, हारिस राऊफ आणि शहनबाज दाहानी.