तब्बल 7 वर्षे लपून-छपून Ashish Nehra ने 'या' मुलीला केलं होतं डेट

नेहराची लव्ह स्टोरी फार मनोरंजक आहे. 

Updated: Jun 2, 2022, 08:53 AM IST
तब्बल 7 वर्षे लपून-छपून Ashish Nehra ने 'या' मुलीला केलं होतं डेट title=

मुंबई : नुकतंच गुजरात टायटन्सने IPL 2022 चं विजेतेपद पटकावलं. दरम्यान अनेकांनी विजयाची क्रेडिट टीमचा मुख्य प्रशिक्षक माजी भारतीय क्रिकेटपटू आशिष नेहरा याला दिलं. दरम्यान फार कमी लोकांना त्याच्या पर्सनल लाईफबद्दल माहिती असेल. यामध्ये नेहराची लव्ह स्टोरी फार मनोरंजक आहे. 

2002 साली द ओव्हलमध्ये इंग्लंडविरुद्धच्या सामन्यादरम्यान आशिष नेहरा त्याची पत्नी रूश्माला पहिल्यांदा भेटला होता. पहिल्या भेटीतच ती त्याला आवडली होती. थोड्या दिवसांनी त्यांचं बोलणं सुरु झालं आणि अखेर मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. या दोघांनी जवळपास 7 वर्ष एकमेकांना लपून-छपून डेट केलं होतं.

23 मार्च 2009 रोजी आशिषने लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि त्याने 15 मिनिटांत त्याने लग्नाचा प्लॅनंही बनवला. एका इंटरव्यूमध्ये बोलताना त्यांने याची माहिती दिली होती. प्लॅन बनवल्यानंतर त्याने घरी याबाबत माहिती दिली आणि आठवडाभरात लग्न करण्याचा निर्णय घेतला.

यानंतर रुश्मा आईसोबत दिल्लीला आली आणि दोघांनी 2 एप्रिल 2009 रोजी लग्न केलं. आता आशिष आणि रुश्मा यांना आरुष नेहरा आणि आरियाना नेहरा ही दोन मुलं आहेत.