Arjun Tendulkar : आयपीएलच्या यंदाच्या हंगामात अर्जुन तेंडुलकरचे (Arjun Tendulkar) पदार्पण अपेक्षित होते, पण ते शक्य झाले नाही. मुंबई इंडियन्सने (mumbai indians) आयपीएल 2022 मध्ये एकूण 22 खेळाडूंना संधी दिली, पण अर्जुन तेंडुलकरसह केवळ आणखी तीन खेळाडूंना एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. आयपीएलच्या गेल्या दोन मोसमांपासून अर्जुन तेंडुलकर अजूनही पदार्पणाच्या प्रतीक्षेत आहे. मात्र अर्जुनचे नाव आयपीएल 2023 साठी (IPL 2023) फ्रँचायझीने रिटेन केलेल्या खेळाडूंमध्येही आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सची नक्की योजना काय आहे याबाबत अद्याप खुलासा झालेला नाही. पण आता आयपीएल 2023 मध्ये तरी अर्जुन खेळणार का अशी शंका आहे. अर्जुनने आयपीएल खेळण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केलीय.
मला कसोटी क्रिकेटमध्ये खेळायचे आहे, असे म्हणत स्वत: अर्जुन तेंडुलकरने त्याच्या ध्येयाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मुंबई इंडियन्सने इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये अर्जुनने काही प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. यावेळी अर्जुन तेंडुलकरला त्याच्या जीवनाचा उद्देश विचारला असता त्याने सांगितले की, माझे ध्येय भारतासाठी कसोटी क्रिकेट खेळणे आहे. त्यामुळे आता अर्जुनने आयपीएल खेळण्याबाबत त्याची भूमिका स्पष्ट केली आहे. क्रिकेट व्यतिरिक्त मला इतर खेळांमध्ये बॅडमिंटन आणि व्हॉलीबॉल आवडते, असे अर्जुनने सांगितले.
दरम्यान, विजय हजारे चषकामध्ये (Vijay Hazare Trophy) अर्जुनने गोव्याकडून हरियाणाविरूद्ध(Goa vs haryana) खेळताना अर्जुनने भेदक गोलंदाजी केली. या सोबतच 10 व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येत अर्जुनने हरियाणाच्या फलंदाजांना रडवलंय. अर्जुनने 4 ओव्हरमध्ये 1 विकेट मिळवली यावेळी त्याचा इकोनॉमी रेट 5.50 इतका होता. यासोबत सामन्यात महत्त्वाच्या वेळी 1 मेडन ओव्हर देखील टाकली. फलंदाजीमध्येही अर्जुनने आपली कमाल दाखवलीय. 1 फोर आणि 1 सिक्सच्या मदतीने 6 बॉल्समध्ये 14 धावांची खेळी अर्जुनने खेळलीय.