दे दणादण...; रणजीमध्ये Arjun Tendulkar नावाचं वादळ काही थांबेना

पुन्हा एकदा सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) मुलगा अर्जुन तेंडुलकरने (Arjun Tendulkar) आपल्या कामगिरीने दाणादाण उडवली आहे. यावेळी फलंदाजी नव्हे तर गोलंदाजीमध्ये आपलं नाणं खणखणीत वाजवलं आहे.

Updated: Dec 27, 2022, 06:48 PM IST
दे दणादण...; रणजीमध्ये Arjun Tendulkar नावाचं वादळ काही थांबेना title=

Arjun Tendulkar : भारतीय देशांतर्गत खेळल्या जाणाऱ्या रणजी ट्रॉफी (2022-23) ला सुरुवात झाली आहे. या स्पर्धेमध्ये एकमागोमाग एक युवा खेळाडू चांगला खेळ करताना दिसतायत. याशिवाय रणजी हा अनकॅप्ड खेळाडूंसाठी एक चांगला प्लॅटफॉर्म असतो. रणजीमध्ये 27 डिसेंबर रोजी गोवा आणि कर्नाटक (Goa vs Karnataka) यांच्यामध्ये सामना खेळवला गेला. दरम्यान या सामन्यात पुन्हा एकदा सचिन तेंडुलकरचा (Sachin Tendulkar) मुलगा अर्जुन तेंडुलकरने (Arjun Tendulkar) आपल्या कामगिरीने दाणादाण उडवली आहे. यावेळी फलंदाजी नव्हे तर गोलंदाजीमध्ये आपलं नाणं खणखणीत वाजवलं आहे.

अर्जुनने पुन्हा एकदा दाखवला रणजीमध्ये 'कमाल'

कर्नाटक टीमची कमान टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज मयांक अग्रवालच्या हाती आहे. अशातच अर्जुनने त्याच्या टीमविरोधात उत्तम गोलंदाजी केली आहे. आजच्या त्याच्या कामगिरीमुळे तो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मयंकने गोव्याच्या टीमविरूद्ध टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान हा निर्णय त्यांच्यासाठी फायदेशीर ठरला.

कर्नाटकचे फलंदाज गोव्याच्या गोलंदाजांचा ऐकत नव्हते. अशावेळी अर्जुनने त्याच्या उत्तम शैलीने गोलंदाजी करत सर्वाचं मन पुन्हा एकदा जिंकून घेतलं. कर्नाटकमधून फॉर्ममध्ये असलेला फलंदाज रवी कुमार समर्थची विकेट अर्जुनने काढली. रवी कुमारने या सामन्यात 140 रन्सची खेळी केली होती. गोव्यासाठी ठरत असलेला हा मोठा अडसर अर्जुनने दूर केला.  

आजच्या या सामन्यात अर्जुन तेंडुलकरने (Arjun Tendulkar) 13 ओव्हर्स टाकले असून 2.31 च्या इकॉनमी रेटने गोलंदाजी केली. यावेळी अर्जुनने केवळ 30 रन्स दिले. तर त्याला एक विकेट देखील मिळाली असून त्याने 2 मेडन ओव्हर देखील टाकल्या.

झारखंड सामन्यातंही चमकला होता अर्जुन

गेल्या सामन्यात अर्जुन तेंडुलकरने यॉर्कर बॉल टाकत झारखंडच्या फलंदाजीची दाणादाण उडवली. या सामन्यामध्ये अर्जुनच्या गोलंदाजीवर खेळणं फलंदाजांना सोप्पं गेलं नाही. तर अर्जुनने एका यॉर्कर बॉलवर शाहबाज नदीमला थेट क्लिन बोल्ड केलंय. हा यॉर्कर बॉलला नदीमला खेळताच आला नाही. 

शाहबाज नदीम फलंदाजी करत असताना अर्जुन तेंडुलकर गोलंदाजी करत होता. यावेळी अर्जुनने एक यॉर्कर फेकला, जो बॉल नदीमला समजलाच नाही आणि तो विकेट गमावून बसला. विकेट मिळाल्यानंतर अर्जुनने सेलिब्रेशन देखील केलं. अर्जुनने 26 ओव्हरमध्ये 3.46 च्या इकोनॉमीने गोलंदाजी करत एक विकेट घेतली. 

डेब्यू सामन्यात अर्जुनने केलं होतं शतक

गोव्याकडून पदार्पण करताना अर्जुनने 179 चेंडूत शानदार शतक पुर्ण केले. गोवा विरूद्ध राजस्थानच्या सामन्यात त्याने हा पराक्रम केला होता. सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या अर्जुन तेंडुलकरने शानदार फलंदाजी करत विरोधी संघाला रोखून धरले. अर्जुन तेंडुलकरने 178 चेंडूंमध्ये 12 चौकार आणि 2 षटकारांसह आपले शतक पूर्ण केलं होतं.