Harshal Patel: आजच्या बंगळूरूच्या चिन्नस्वामी स्टेडियममध्ये दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) विरूद्ध रॉयल चॅलेंजर बंगळूरू (Royal Challengers Bangalore) यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात देखील दिल्लीला विजयाचं खातं उघडता आलेलं नाही. मुख्य म्हणजे दिल्लीने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र तरीही दिल्लीला आरसीबीकडून पराभवाचा सामना करावा लागला. मुख्य म्हणजे, या सामन्यातील एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होतोय. आणि यामुळे चाहते थेट मॅच फिक्सिंगचा (Match fixing) आरोप करतायत.
टॉस हरल्यानंतर आरसीबीची टीम प्रथम फलंदाजीला आली. यावेळी फाफ आणि विराटने टीमला चांगली सुरुवात करून दिली. हे दोघंही फलंदाज आऊट झाल्यानंतर पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी फाफने हर्षल पटलेला मैदानात पाठवलं. मात्र अवघ्या 6 रन्सवर तो देखील पुन्हा पव्हेलियनमध्ये परतला. मात्र यावेळी 14 व्या ओव्हरमध्ये अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर हर्षलने एक शॉट खेळला जो, चर्चेचा विषय बनला.
अक्षरने बॉल टाकला आणि हर्षलने एक मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. त्याच्याकडून चूक झाली आणि हा बॉल मिस झाला. मागे उभ्या असलेल्या विकेटकीपरकडे हा बॉल गेला आणि विकेटकीपरने अपील केलं.
दरम्यान याचा निर्णय थेट थर्ड अंपायरकडे गेला. यावेळी अल्ट्राजमध्ये बॉल टाकण्यापूर्वीच अल्ट्राजचे मार्क्स आले. दरम्यान यावरून आता एकच गदारोळ माजला. चाहते आता या बॉलवरून प्रश्न उपस्थित करतायत.
अक्षरच्या बॉलवर हर्षलने लाँग फॉफच्या दिशेने शॉट मारण्याचा प्रयत्न केला. मात्र हा शॉट मिस झाल्याने विकेटकीपरच्या हाती बॉल गेला. यावेळी थर्ड अंपायर स्टंपिंग करण्यापूर्वी अल्ट्रा एज तपासत असताना जेव्हा बॉल बॅटपासून लांब होता, तेव्हाही अल्ट्रा एजमध्ये एक लाईन दिसत होती. ही लाईन नेमकी कशामुळे आली, याबाबत मात्र चाहत्यांच्या मनात प्रश्नाने घर केलं.
यामागे अनेक कारणं असू शकतात. एकंदरीत यामागील कारणांचा विचार केला तर, हर्षल पटेलच्या शूजचा आवाज अल्ट्रा एजने पकडण्याची शक्यता आहे. दरम्यान याचमुद्द्यावरून चाहते प्रश्न उपस्थित करतायत. यावरून सोशल मीडियावर एका युजरने ट्विट करून, याची सखोल चौकशी झाली पाहिजे, असं म्हटलंय. शिवाय हे मॅच फिक्सिंग असू शकतं, असंही ट्विटमध्ये म्हटलंय.
How is this given as out???
This needs serious investigation man, dear @BCCI @ICC plz look at this
Is the smell of match fixing#RCBvDC @BCCI @ICC #harshalpatel #matchfixing pic.twitter.com/PvkX281Dqm
— kohlibhakt (@Pavancool06J) April 15, 2023
दरम्यान हे प्रकरणं जेव्हा थर्ड अंपायर कडे गेलं, त्यावेळी स्टंपिंग चेक करण्यात आलं. अंपायरने स्टंपिंग करण्यापूर्वी अल्ट्रा एज तपासलं. मात्र या प्रकरणांमध्ये स्टंपिंग तपासण्याची गरज नव्हती.