मुंबई: किंग कोहलीनं वन डे आणि टी 20 पाठोपाठ आता कसोटीचंही कर्णधारपद सोडलं आहे. त्यानंतर आता क्रिकेट जगतातील अनेक दिग्गजांनी कोहलीला शुभेच्छा दिल्या आहेत. तर आता अभिनेत्री आणि कोहलीची पत्नी अनुष्का शर्माने एक इमोशनल पोस्ट शेअर केली आहे.
2014 सालातील तो दिवस मला आजही आठवतो, जेव्हा तू मला म्हणाला होतास की तुझ्याकडे कर्णधारपद देण्यात आलं आहे. एमएस धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला होता. मला आठवतंय एमएस, तू आणि मी त्या दिवशी नंतर गप्पा मारत होतो. त्यावेळी मी तुझ्या दाढीवरून गंमत केली होती. त्या गमतीवर सर्वजण मनभरून हसले होते.
त्या दिवसापासून कित्येक पावलं मी तुला पुढे जाताना पाहिलं आहे. टीम इंडियाचा कर्णधार आणि तुझ्या नेतृत्वाखाली संघानं केलेल्या कामगिरीचा मला खूप अभिमान आहे. तू स्वत: मिळवलेल्या यशाचा मला जास्त अभिमान वाटतो. काही पराभवांमध्ये तुमच्या डोळ्यात आलेले अश्रूही पाहिले.
तू कायमचं साध राहाणं पसंत केलं. दिखावा हा तर तुमचा पहिल्यापासून शत्रू आहे. हिच गोष्ट माझ्या आणि चाहत्यांच्या नजरेत तू कायमच महान राहिला आहेस. तू करत असलेल्या गोष्टीमागे तुझा हेतू खूप चांगला होता. प्रत्येकाला ते खरोखर समजणार नाही. ज्या लोकांनी तुला जाणून घेण्याचा प्रयत्न केला ते लोक खूप धन्य आहेत.
तू कधीच हव्यास नाही बाळगलास त्यामुळे तू जे केलंस ते मनापासून आणि यशस्वी होण्यासाठी केलंस, त्यासाठी तू तुझ्यातली कोणतीही कमतरता लपवली नाही. योग्य काम करण्यासाठी पुन्हा तुला उभं राहायचं होतं. कर्णधारपदाचाही तुला कधी हव्यास नव्हता असंही अनुष्काने म्हटलं आहे. आमच्या मुलीला या 7 वर्षांचे धडे तिच्या वडिलांमध्ये दिसणार आहेत. तू जे केलंस ते चांगलं केलंस असंही अनुष्का यावेळी विराटसाठी म्हणाली आहे.