IPL 2021: Anti Dopping Test होणार की नाही? BCCI ने दिली महत्त्वाची माहिती

IPL 2021 यंदाच्या हंगामातील डोपिंग टेस्ट रद्द; काय आहे कारण? BCCI काय म्हणाले पाहा

Updated: Oct 2, 2021, 06:17 PM IST
IPL 2021: Anti Dopping Test होणार की नाही? BCCI ने दिली महत्त्वाची माहिती title=

मुंबई: IPL 2021 चे दुसऱ्या टप्प्यातील सामने सुरू आहेत. याच दरम्यान एक मोठी बातमी हाती येत आहे. यंदाच्या हंगामात Anti Dopping Test होणार नाही असं सांगण्यात आलं आहे. UAE मध्ये सुरू असलेल्या IPL 2021च्या दुसऱ्या टप्प्यात डोपिंगची चाचणी होणार नसल्याची माहिती मिळाली आहे. याचं नेमकं काय कारण आहे तेही बीसीसीआयने स्पष्ट केलं आहे. 

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) कोरोनाच्या भीतीमुळे IPL 2021 साठी दुसऱ्या टप्प्यात तयार केलेल्या बायो-बबलमध्ये राष्ट्रीय डोपिंग विरोधी एजन्सी (NADA) च्या अधिकाऱ्यांना जाण्याची परवानगी दिली नाही. मिळालेल्या माहितीनुसार दुसऱ्या टप्प्यात NADA ला कोरोनाच्या भीतीमुळे कडक बायो बबलमध्ये जाण्यापासून रोखण्यात आलं आहे. 

पहिल्या टप्प्यातील सामन्यांसाठी तीन शहरांमध्ये डोपिंगची चाचणी करण्यासाठी परवानगी देण्यात आली होती. आयपीएल 2021 च्या पहिल्या टप्प्यात नाडाच्या एका अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाल्यानंतर डोपिंगच्या चाचण्या थांबवण्यात आल्या. मुंबई, चेन्नई आणि दिल्ली इथे तीन ठिकाणी चाचण्या करण्यात आल्या होत्या. मात्र नाडाच्या एका अधिकाऱ्याला कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर कोरोनाची भीती अधिक वाढली. 

या घटनेची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आणि कोरोनाच्या भीतीमुळे पुन्हा एकदा हा प्रकार घडू नये म्हणून BCCI ने NADAला UAE मध्ये परवानगी दिली नाही. त्यामुळे UAE मध्ये असलेल्या खेळाडूंची Anti dope test होणार नाही. हे सर्व खेळाडू सध्या कडक बायो बबलमध्ये आहेत.