PSL स्पर्धेत दुर्घटना, आंद्रे रसेलला स्ट्रेचरवर न्यावं लागलं मैदानाबाहेर

मुसाने आखूड टप्प्याचा टाकलेल्या चेंडूचा रसेलला अंदाज आला नाही आणि चेंडू थेट रसेलच्या हेलमेटवर आदळला.

Updated: Jun 12, 2021, 06:46 PM IST
PSL स्पर्धेत दुर्घटना, आंद्रे रसेलला स्ट्रेचरवर न्यावं लागलं मैदानाबाहेर title=

नवी दिल्ली - कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे स्थगित करण्यात आलेली पाकिस्तान क्रिकेट लीग (PSL) पुन्हा एकदा सुरु करण्यात आली आहे. युएईमध्ये खेळवण्यात येत असलेल्या या स्पर्धेत जगभरातील दिग्गज खेळाडूंचा समावेश आहे. यात वेस्टइंडिजचा ऑलराऊंडर खेळाडू आंद्रे रसेल याचाही समावेश आहे. नुकत्याच झालेल्या एका सामन्यात आंद्रे रसेलला गंभीर दुखापतीचा सामना करावा लागला

रसेलच्या हेलमेटवर आदळला बाऊंसर

जगभरातील मोजक्या आक्रमक बॅट्समनमध्ये आंद्रे रसेलचा समावेश होतो. पण आखूड टप्प्याच्या चेंडु रसेलची कमकुवत बाजू आहे. इस्लामाबाद युनायटेड आणि क्वेटा ग्लॅडिएटर्स सामन्या दरम्यान नेमका याच चेंडुचा सामना करताना तो गोंधळुन गेला. इस्लामाबाद युनाटेडच्या मोहम्मद मुसाने चौदाव्या षटकात रसेलने दोन सिक्स मारले. पण त्यानतंर मुसाने आखूड टप्प्याचा टाकलेल्या चेंडूचा रसेलला अंदाज आला नाही आणि चेंडू थेट रसेलच्या हेलमेटवर आदळला. फिजिओने तात्काळ मैदानावर धाव घेत रसेलची तपासणी केली. रसेल पुन्हा एकदा बॅटिंगसाठी पिचवर आला. पण पुढच्या चेंडूवर रसेल बाद झाला.

स्ट्रेचरवरुन न्यावं लागलं बाहेर

बाद झाल्यावर रसेल पॅव्हेलिअनच्या दिशेन निघाला पण डोक्याला झालेल्या दुखापचीचा त्रास स्पष्ट जाणवत होता. त्याची तब्येत काहीशी अस्वस्थ झाली. त्यामुळे तात्काळ स्ट्रेचरवरुन मैदानाबाहेर नेण्यात आलं. यानंतर अॅम्ब्युलन्समधून त्याला रुग्णालयात नेण्यात आलं.

10 विकेटने इस्लामाबाद विजयी

या सामन्यात पहिली बॅटिंग करणाऱ्या ग्लॅडिएटर्सने इस्लामाबादसमोर 134 धावांचं लक्ष ठेवलं होतं. याला उत्तर देताना इस्लामाबादने 10 ओव्हरमध्य एकही विकेट न गमावता सामना सहज जिंकला. इस्लामाबादकडून सलामीला आलेल्या कोलिन मुनरो आणि उस्मान ख्वाजाने दमदार बॅटिंग करत विजयावर शिक्कामोर्तब केलं.