India vs Australia Final: अखेर यंदाच्या वर्ल्डकपचा आज महामुकाबला रंगणार आहे. टीम इंडिया विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये क्रिकेटचा विश्वविजेचा ठरणार आहे. दोन्ही टीम्सने सेमीफायनलमध्ये विजय मिळवून फायनलचं तिकीट मिळवलं आहे. अशातच आजच्या या महत्त्वाच्या सामन्यासाठी टीम इंडियाची प्लेईंग 11 कशी असणार आहे, याबाबत कर्णधार रोहित शर्माने काय म्हटलंय हे पाहूयात.
तब्बल 12 वर्षांनंतर म्हणजेच 2011 नंतर टीम इंडियाला वर्ल्डकप जिंकायचा आहे. टीम इंडियाने 1983 आणि 2011 मध्येच वर्ल्डकप जिंकला आहे. अशा स्थितीत रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया तिसऱ्यांदा विश्वविजेता होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी भारताचा कर्णधार रोहित शर्माने फायनलसाठी प्लेइंग इलेव्हनच्या संदर्भात प्रश्नाचं उत्तर दिलंय.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध वर्ल्डकप 2023 च्या अंतिम सामन्याच्या पूर्वसंध्येला आयोजित पत्रकार परिषदेदरम्यान रोहित शर्माला प्लेइंग इलेव्हनबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. यावेळी रोहित शर्मा म्हणाला, "आम्ही प्लेइंग इलेव्हनबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. टीममध्ये असलेल्या 15 खेळाडूंपैकी कोणीही खेळू शकतो. आम्ही विकेटचा अभ्यास करून निर्णय घेऊ. आम्हाला विकेट पाहून निर्णय घ्यावा लागणार आहे."
आतापर्यंत वर्ल्ड कपमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया आतापर्यंत 13 वेळा आमनेसामने आले आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलियाचं पारड जड दिसून येतं. कांगारूंनी आतापर्यंत अधिक विजयाची नोंद केली आहे. भारताला केवळ 5 सामने जिंकता आले आहेत. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाच्या नावावर 8 विजय आहेत. मात्र या खेळपट्टीवर टीम इंडियाचा रेकॉर्ड उत्तम असल्याचं पहायला मिळालंय.
भारत (प्लेइंग इलेव्हन): रोहित शर्मा (C), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (w), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): ट्रॅव्हिस हेड, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, ग्लेन मॅक्सवेल, जोश इंग्लिस (W), पॅट कमिन्स (C), मिचेल स्टार्क, अॅडम झाम्पा, जोश हेझलवूड.