Chennai Cyclone Michaung Flood : चेन्नई शहरामध्ये सध्या पावसाने हाहाकार माजवला आहे. सततचा पाऊस अन् वादळी वाऱ्यामुळे चेन्नईतील (Chennai Cyclone) नागरिकांना संकटाचा सामना करावा लागतोय. मिचाँग चक्रीवादळ (Cyclone Michaung) तामिळनाडू किनारपट्टीजवळ आल्याने चेन्नईमधील अनेक भागात मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे जनजीवन विस्खळीत झाल्याचं चित्र आता समोर आलं आहे. अशातच आता चेन्नईच्या या परिस्थितीवर टीम इंडियाचा खेळाडू अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) याने ट्विट केलं आहे.
चेन्नईतील सर्वजण सुरक्षित राहावी, हीच माझी इच्छा आहे. त्याचबरोबर ज्या व्यक्ती युद्धपातळीवर काम करत सर्वांची मदत करत आहेत, त्यांच्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो, असं अजिंक्य रहाणे याने म्हटलं आहे.
Wishing for the safety of everyone in Chennai and extending my gratitude to everyone working at ground zero!
— Ajinkya Rahane (@ajinkyarahane88) December 4, 2023
श्रीलंकेचा फिरकीपटू महेश तीक्षाना याने तामिळनाडूच्या परिस्थितीवर चिंता व्यक्त केली आहे. माझ्या दुसऱ्या घराशी संबंधित काही फुटेज पाहून मी अस्वस्थ झालो आहे, असं त्यांनी ट्विटरवरील एका पोस्टद्वारे म्हटलं होतं. चेन्नई शहराच्या विविध भागात अति मुसळधार पाऊस (Rain Update) पडत आहे. शिवाय हवामान विभागाने येथील स्थानिक नागरिकांना घराबाहेर न पडण्याचा इशारा दिला आहे. पावासाने जोर धरल्यामुळे येथील रस्ते पाण्यात गेले आहेत, तर दुसरीकडे रस्त्यांवर असलेल्या गाड्या पाण्यात वाहून जाताना दिसतायेत. तर चक्रिवादळामुळे सरकारने सार्वजनिक सुट्टी जाहीर केल्याची माहिती समोर आलीये.
मोठ्या ताकदीने किनाऱ्याकडे येत असलेलं मिचौंग चक्रीवादळ 5 डिसेंबर रोजी आंध्रप्रदेशातील किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता आहे. या वादळामुळे किनारपट्टीवर 110 किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहे. सोमवारनंतर राज्यात मंगळवारी सुद्धा मुसळधार पावसाचा (Rain Update) इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे.
मुसळधार पाऊस आणि वादळामुळे आतापर्यंत 204 ट्रेन आणि 70 उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. तर विमानतळाच्या धावपट्टीवर विमानांचे आगमन आणि निर्गमन सोमवारी रात्री 11 वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आले आहे. दक्षिण रेल्वेने ट्रेन रद्द केल्यामुळे प्रभावित झालेल्या सर्व प्रवाशांना पूर्ण रिफंड देखील जाहीर केला आहे.
Worst ever Cyclone in the recent times for Chennai. Rain is not slowing down, got stuck in this Cyclone Michaung In & Around Chennai Fellow Citizens Be Safe #RainAlert #Chennai#ChennaiFloods #ChennaiRains2023 #ChennaRains #ChennaiCyclone#CycloneMichuang #ChennaiCorporation pic.twitter.com/4xo9frHa7g
— Pooja_Queen_Love (@POOJAQUEEN_999K) December 4, 2023
दरम्यान, चक्रीवादळ 'मिग्झोम'चा प्रभाव ओडिशा, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि पुद्दुचेरीमध्ये असेल. आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये आज आणि तेलंगणामध्ये 5 डिसेंबरसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. ओडिशामध्ये 5 डिसेंबरला ऑरेंज अलर्ट आहे.