टीम इंडियापासून दूर असूनही कोटींच्या संपत्तीचा मालक आहे Ajinkya Rahane

तुम्हाला माहितीये का रहाणेचं वार्षिक उत्पन्न किती आहे. चला तर मग आज जाणून घेऊया.

Updated: Jun 22, 2022, 12:58 PM IST
टीम इंडियापासून दूर असूनही कोटींच्या संपत्तीचा मालक आहे Ajinkya Rahane title=

मुंबई : मराठमोळा खेळाडू आणि टीम इंडियाच्या टेस्ट टीमचा माजी उपकर्णधार अजिंक्य रहाणेचा चाहता वर्ग काही कमी नाहीये. रहाणे मुंबईकडून देखील देशांतर्गत क्रिकेट खेळला. त्याचा क्रिकेट प्रवास डोंबिवली, मुंबईमधून सुरू झाला. पुढे टीम इंडियाचा महत्त्वाचा सदस्य बनला आणि अनेक महत्त्वाचे सामने जिंकले. मात्र तुम्हाला माहितीये का रहाणेचं वार्षिक उत्पन्न किती आहे. चला तर मग आज जाणून घेऊया.

मिळालेल्या एका अहवालानुसार, अजिंक्य रहाणेची एकूण संपत्ती USD 9 दशलक्ष इतकी आहे. भारतीय रुपयात ते सुमारे 65 कोटी आहे. क्रिकेट हेच रहाणेच्या कमाईचं प्रमुख साधन आहे. याशिवाय तो ब्रँड एंडोर्समेंटमधूनही चांगली कमाई करतो.

अजिंक्य रहाणेची ब्रँड व्हॅल्यू देखील खूप जास्त आहे. तो जगातील सर्वात प्रतिष्ठित खेळाडू देखील आहे. तो विविध आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय क्रिकेट सामने आणि इंडियन प्रीमियर लीग (IPL) मधून पैसे कमावतो. यंदाच्या आयपीएल मेगा लिलावात कोलकाता नाईट रायडर्सने रहाणेला एक कोटी रुपयांच्या बेस प्राईजमध्ये खरेदी केलं होतं.

हाती आलेल्या रिपोर्टनुसार, रहाणे एका महिन्यात 50 लाखांहून अधिक पैसे कमावतो. त्याचे वार्षिक उत्पन्न 6 कोटींहून अधिक आहे. 

बीसीसीआयने रहाणेसोबत बी ग्रेड वार्षिक करार केला आहे. अशा स्थितीत त्यांना बीसीसआयकडून तीन कोटी रुपये मिळाले. त्याच वेळी, तो ब्रँड एंडोर्समेंटमधून एका वर्षात सुमारे 1 कोटी रुपये कमावतो.