Ajinkya Rahane : इंग्लंडच्या ओव्हल मैदानावर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा ( ICC World Test Championship ) फायनल सामना सुरु आहे. आज या सामन्याचा तिसरा दिवस असून टीम इंडियाचे प्रमुख फलंदाज कांगारूंच्या गोलंदाजीसमोर फेल गेले. यावेळी ऑस्ट्रेलियाच्या भेदक माऱ्यासमोर केवळ टीम इंडियाचा मराठमोळा खेळाडू अजिंक्य रहाणे एकटा टिकून उभा होता. फलंदाजीला येत अजिंक्यने ( Ajinkya Rahane ) स्वतःला सिद्धंही करून दाखवलं शिवाय टीम इंडियाचा डाव देखील सावरला.
रोहित शर्मा, विराट कोहली तसंच चेतेश्वर पुजारा ही टीम इंडियाची टॉप आर्डर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये ( ICC World Test Championship ) फेल गेली. मात्र 18 महिन्यांनी कमबॅक केलेल्या अजिंक्य रहाणेने ( Ajinkya Rahane ) मात्र हार मानली नाही. यावेळी अजिंक्य रहाणेला खेळताना दुखापत झाल्याचंही समोर आलं, पण तरीही अजिंक्यने देशासाठी क्रिझ सोडली नाही.
ऑस्ट्रेलियाच्या भेदक गोलंदाजीसमोर टीम इंडियाचा कोणताही गोलंदाज टिकू शकला नाही. यावेळी टीम इंडियासाठी पुन्हा एकदा मराठमोळा अजिंक्य रहाणेच ( Ajinkya Rahane ) धावून आला. ऑस्ट्रेलियामध्येच अजिंक्यने कांगारून गोलंदाजांना आपलं जुनं रूप दाखवून दिलं. यानंतर सोशल मीडियावर पुन्हा एकदा अजिंक्यच्या ( Ajinkya Rahane ) नावाची चर्चा सुरु झाली. मात्र फलंदाजी करत असताना त्याला दुखापत झाली.
टीम इंडिया फलंदाजी करत असताना 22 व्या ओव्हरमध्ये पॅट कमिंस गोलंदाजी करत होता. यावेळी कमिंसने रहाणेला टाकलेला बॉल थेट हातावर जाऊन लागला. बॉल इतका जोरात लागला की, रहाणेच्या ( Ajinkya Rahane ) बोटाला दुखापत झाली. रहाणेला झालेल्या वेदना त्याच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होत्या. यानंतर रहाणे फिजिओची मदत घेतली. वेदना होत असताना देखील रहाणेने ( Ajinkya Rahane ) क्रिझ सोडण्याचा निर्णय घेतला नाही. त्याच्या या निर्णयाने त्याचं सोशल मीडियावर चांगलच कौतुक होताना दिसतंय.
Media credits : Star Sports pic.twitter.com/lDqps660Ns
— rajendra tikyani (@Rspt1503) June 8, 2023
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या ( ICC World Test Championship ) फायनल सामन्यात अजिंक्य रहाणेने ( Ajinkya Rahane ) मैदानावर केलेल्या कृत्यामुळे त्याच्यावर आयसीसीचा नियम तोडण्याचा आरोप लावण्यात येतोय. याचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
फिल्डींग करताना अजिंक्य रहाणे त्यांच्या दोन्ही हातांवर थुंकताना दिसतोय. दरम्यान हातावर थुंकणं हे नियमांच्या विरोधात नाहीये. मात्र रहाणेने जर हातावर थुंकल्यानंतर त्याच हाताने बॉल उचलला तर बॉलला शाईन आली असती. असं झाल्यास आयसीसीच्या नियमांचं उल्लंघन होऊ शकतं. यामुळे रहाणेवर ( Ajinkya Rahane ) सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीकाही करण्यात आली.