Afg vs Sl : आशिया कपनंतर टी-20 वर्ल्ड आता झाला असून प्रत्येक संघाच्या मालिका खेळवल्या जात आहेत. अफगाणिस्तान आणि श्रीलंकेमध्ये वनडे मालिका सुरू आहे. पहिल्याच सामन्यामध्ये अफगाणिस्तान संघाने श्रीलंकेचा पराभव केला आहे. अफगाणिस्तान संघाने एतिहासिक विजय मिळवला आहे. (Afghanistan defeated Sri Lanka ODi sport marathi news)
अफगाणिस्तानने प्रथम फलंदाजी करताना 294 धावा केल्या. यामध्ये 20 वर्षीय सलामीवीर इब्राहिम झद्रानने 106 धावांची दमदार खेळी केली. सहावा सामना खेळणाऱ्या इब्राहिमने खतरनाक बॅटींग करत आपली ताकद दाखवून दिली आहे. कारण सहा सामन्यात हे त्याचं दुसरं शतक आहे. त्यासोबतच रहमानउल्ला गुरबाजने 53 धावा करत अर्धशकत केलं. तर नजीबुल्ला झद्रानेही 42 धावा करत संघाच्या धावसंख्येत मोलाचं योगदान दिलं.
श्रीलंकेचे फलंदाज अपयशी ठरले, पाथुम निसांकाच्या 85 धावा आणि हसरंगाच्या 66 धावा सोडल्या तर इतर कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. श्रीलंकेचा संघ 234 धावांवर ऑल आऊट झाला. अफगाणिस्तानकडून आपल्या गोलंदाजीने सर्वांना प्रभावित करणारा डावखुरा गोलंदाज फझलहक फारुकीने सर्वाधिक 4 विकेट्स घेत विजयामध्ये मोलाची भूमिका बजावली. त्याच्यासोबत गुलबादिन नाईबने 3 विकेट्स घेतल्या.
दरम्यान, अफगाणिस्तानने वनडे सामन्यात श्रीलंकेला त्यांच्या घरच्या मैदानावर हरवंल आहे. अफगाणिस्तानचा हा दुसरा विजय आहे. याआधी त्यांनी 4 वर्षांपूर्वी 2018 मध्ये आशिया चषक स्पर्धेत प्रथमच श्रीलंकेचा पराभव केला होता.