अफगाणिस्तानने इतिहास घडवला, टेस्ट क्रिकेटमधला पहिला विजय मिळवला

अफगाणिस्तानच्या क्रिकेट टीमने इतिहास घडवला आहे.

Updated: Mar 18, 2019, 04:00 PM IST
अफगाणिस्तानने इतिहास घडवला, टेस्ट क्रिकेटमधला पहिला विजय मिळवला title=

देहरादून : अफगाणिस्तानच्या क्रिकेट टीमने इतिहास घडवला आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये अफगाणिस्तानच्या टीमने पहिलाच विजय मिळवला आहे. आयर्लंडविरुद्धच्या टेस्टमध्ये अफगाणिस्तानचा ७ विकेटने विजय झाला. रेहमत शाह आणि इहसुनल्लाह जनत यांच्या अर्धशतकामुळे अफगाणिस्तानने १४७ रनचं आव्हान पूर्ण केलं. देहरादूनच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर ही मॅच खेळवण्यात आली.

आयर्लंडने ठेवलेल्या १४७ रनचा पाठलाग करताना अफगाणिस्तानला सुरुवातीला धक्के बसला. ओपनर मोहम्मद शहजाद २ रन करूनच माघारी परतला. पण शहजादबरोबर ओपनिंगला आलेला इहसुनल्लाहनं ६५ आणि शाहने ७६ रनची खेळी केली. यामुळे आयर्लंडविरुद्धची एकमेव टेस्ट अफगाणिस्तानने जिंकली. इहसुनल्लाह आणि शाह यांच्यामध्ये तिसऱ्या विकेटसाठी १३९ रनची पार्टनरशीप झाली. यामुळे अफगाणिस्तानचा चौथ्या दिवशीच विजय झाला.

याआधी अफगाणिस्तानचा स्पिनर राशिद खाननं ८२ रन देऊन आयर्लंडच्या ५ विकेट घेतल्या. तर यामिन अहमदझाई आणि वकार सलामखईल यांना अनुक्रमे ३ आणि २ विकेट मिळाल्या. यामुळे दुसऱ्या इनिंगमध्ये आयर्लंडचा २८८ रनवर ऑलआऊट झाला. आयर्लंडसाठी एन्ड्र्यू बालबिरनी याने १४९ बॉलमध्ये सर्वाधिक ८२ रनची खेळी केली. तर केव्हिन ओब्रायनने ७८ बॉलमध्ये ५६ रन केले.

आयर्लंडनं पहिल्या इनिंगमध्ये केलेल्या १७२ रननंतर बॅटिंगला आलेल्या अफगाणिस्तानने ३१४ रन केले.

या दोन्ही देशांना मागच्याच वर्षी टेस्ट क्रिकेटचा दर्जा मिळाला होता. या दोन्ही टीमची ही दुसरी टेस्ट होती. अफगाणिस्तान मागच्यावर्षी भारताविरुद्ध बंगळुरूमध्ये पहिली टेस्ट खेळली होती. या टेस्टमध्ये त्यांचा पराभव झाला होता. 

आपल्या दुसऱ्या टेस्टमध्येच विजयी होणारी अफगाणिस्तान ही दुसरी टीम आहे. याआधी इंग्लंड आणि पाकिस्तानच्या टीमचाही त्यांच्या दुसऱ्याच टेस्टमध्ये विजय झाला होता. आपली पहिलीच टेस्ट खेळताना विजयी होण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या नावावर आहे. 

टीम एवढ्या मॅचनंतर विजय 
ऑस्ट्रेलिया
इंग्लंड
पाकिस्तान
अफगाणिस्तान
वेस्ट इंडिज 
झिम्बाब्वे ११
दक्षिण आफ्रिका १२
श्रीलंका १४
भारत २५
बांग्लादेश ३५
न्यूझीलंड ४५