राशिदच्या कामगिरीवर अफगानिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांची अशी प्रतिक्रिया

मोदींना टॅग करत दिली अशी प्रतिक्रिया

Updated: May 26, 2018, 05:52 PM IST
राशिदच्या कामगिरीवर अफगानिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांची अशी प्रतिक्रिया title=

मुंबई : आयपीएलमध्ये अनेक नव्या खेळाडूंना आपलं कौशल्य दाखवण्याची संधी मिळते. यंदाच्या आयपीएल सीजनमध्ये अफगानिस्तानच्या 19 वर्षीय राशिद खानने आपल्या कामगिरीने सगळ्यानाच प्रभावित केलं आहे. बॉलिंग असो, बॅटींग असो की फिल्डींग सगळ्याच फॉरमॅटमध्ये त्याने आपली कामगिरी दाखवली. भारतीय क्रिकेट फॅन्स त्याला भारतीय नागरिकत्व देण्याची मागणी करत आहेत यावरुनच अंदाज येऊ शकतो की त्याची कामगिरी किती शानदार होती. अफगानिस्तानचे राष्ट्रध्यक्ष अशरफ गनी यांनी देखील राशिदचं कौतूक केलं आहे. त्यांनी म्हटलं की, अफगानच्या या हिरोचा मला अभिमान आहे. मी माझ्या भारतीय मित्रांना धन्यवाद देतो की त्यांनी त्याला संधी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींना टॅग करत राशिदने बद्दल त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली. त्यांनी पुढे म्हटलं की, राशिद क्रिकेट जगतातील संपत्ती झाला आहे. या सामन्यात हैदराबादने 13 रनने विजय मिळवला. या विजयासह हैदराबादने फायनलमध्ये धडक मारली आहे. पण हैदराबादच्या या विजयाचं संपूर्ण श्रेय राशिद खानला जातं. आता रविवार चेन्नई आणि हैदराबादमध्ये फायनल होणार आहे.